Friday, May 17, 2024
Homeराजकीयरायगट्टा येथे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत नवीन अंगणवाडी चे लोकार्पण...

रायगट्टा येथे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत नवीन अंगणवाडी चे लोकार्पण…

Share

अहेरी: रायगट्टा येथील नूतन अंगणवाडी बांधकामाचे माजी आ.दीपक दादा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत खांदला अंतर्गत रायगट्टा येथे जीर्ण झालेली अंगणवाडी होती.या मुळे लहान मुलांना अंगणवाडी मध्ये बसवून शिक्षण देणे हे धोक्याचे होते म्हणून तेथील गावकऱ्यांनी सन 2021-2022 मध्ये माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडे नवीन अंगणवाडी इमारत बांधकामाची मागणी केले असता माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषद येथे पाठपुरावा करून नवीन अंगणवाडी मंजूर केली होती.

अंगणवाडी चे बांधकाम पुर्णत्वास आले असून माजी सरपंचा सौ शकुंतला माधव कुडमेथे यांच्या हस्ते लोकार्पण करून गावातील चिमुकल्यांना नवीन वास्तू उपलब्ध करून देण्यात आले. या अंगणवाडी च्या लोकार्पण च्या वेळी प्रामुख्याने गावाचे पोलीस पाटील सत्यम बंडमवार,माजी सरपंचा ज्योतीताई जुमनाके,माजी उपसरपंच गुरुदास पेंदाम, माजी उपसरपंच भगवान मडावी,माजी ग्राप सदस्य नारायणजी कंबगोनीवार,माजी ग्राप सदस्या वंदना अलोने,माजी ग्राप सदस्या महेश्वरी बत्त्तूलवार,

माजी ग्राप सदस्य सुधाकर आत्राम,व्यंकण्णा कडार्लावार,नागेश चिंतावार,रामशंकर अंबलीपवार,नारायण चिटकला, संतोष मोहूर्ले,रज्जू मोहूर्ले,रमेश पोरतेट, लक्ष्मण पोरतेट, संपत चिटकला,दुर्गाजी आलाम,ग्रामसेविका संतोषी सडमेक,अंगणवाडी सेविका रेखा पुण्यमूर्तीवर, मदतनीस छाया तलांडे उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: