Saturday, May 4, 2024
Homeराज्यनांदेड शहरात रविवारी शिवजयंती निमित्त वाहतूक मार्गात बदल...

नांदेड शहरात रविवारी शिवजयंती निमित्त वाहतूक मार्गात बदल…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

रविवार 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती निमित्त शहरात मिरवणूका काढण्याची शक्यता आहे. या कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी. राष्‍ट्रीय एकात्‍मता जोपासणे व सर्व सामान्‍य नागरीकांचे हित लक्षात घेवून रविवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुढील मार्गावरील वाहतूक बंद ठेवून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची अधिसूचना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी निर्गमीत केली आहे.

वाहतूकीसाठी बंद असलेले मार्ग जुना मोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजीराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आय.टी.आय चौकापर्यंत जाण्या-येण्यास बंद, राज कार्नर कडून आय.टी.आय कडे येण्यासाठी राज कार्नर, वर्कशॉप टी पॉईट, श्रीनगर ते आय.टी.आय पर्यत डावी बाजू बंद. राज कार्नर ते तरोडा नाकाकडे जाण्यासाठी डावी बाजू बंद, बर्की चौक ते जूना मोंढाकडे येण्यासाठी बंद, सिडको/ हडको ते जुना मोंढयाकडे येण्यासाठी बंद.

वाहतूकी करीता पर्यायी मार्ग- बर्की चौकाकडून जुना मोंढयाकडे येणारी वाहतूक महम्मंद अली (गणेश टॉकीज) रोडचा जाण्या-येण्यासाठी वापर करतील, वजीराबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक वजिराबाद चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रिज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करतील,

राज कार्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राज कार्नर, वर्कशॉप कार्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागाजुर्ना टी पॉईट, अण्णाभाऊ साठे चौक, यात्री निवास पोलीस चौकी, अबचलनगर ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापर करतील, गोवर्धन घाट पुलावरुन नांदेड शहरात येणारी वाहतूक पोलीस मुख्यालय कॉर्नर,

लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्यासाठी वापर करतील, सिडको/हडको कडून येणारी वाहतूक साई कमान, गोवर्धन घाट नवीन पुल, तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्यासाठी वापर करतील.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: