Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयगोकुळ शिरगाव परिसरामध्ये चुरशीने ८० टक्क्यांवर मतदान कणेरीवाडीत सर्वाधिक ९१ टक्के मतदान...

गोकुळ शिरगाव परिसरामध्ये चुरशीने ८० टक्क्यांवर मतदान कणेरीवाडीत सर्वाधिक ९१ टक्के मतदान…

Share

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महत्त्वाच्या गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, नेर्ली ,कणेरी आणि कणेरीवाडी या गावांमध्ये चुरशीने मतदान झाले असून बहुतांश सर्व गावांमध्ये ८० टक्क्यांवर मतदान झाले असून सर्वाधिक कणेरीवाडी ९१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून नेर्लीमध्ये ८८.२% इतके मतदान झाले आहे. नेर्लीत मतदान यंत्र बंद पडल्यामुळे सुमारे दीड तास मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. तसेच यंत्रातील बिघाडामुळे सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते .

तसेच नेर्लीमध्ये एकाच नावाच्या दोन महिला मतदानासाठी आल्यामुळे दोघींनाही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. कणेरीत ८१ टक्के मतदान झाले असून विकासवाडी येथे ८७ टक्के मतदान झाले आहे. नेर्लीमध्ये ८८.२०% ,उजळाईवाडीत ७७.८९% मतदारांनी आपला हक्क बजावला असून किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.

मतदान शांततेत पार पडण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने व सहकारी यांनी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.नेर्ली येथे मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे उशिरापर्यंत मतदानासाठी गर्दी पाहायला मिळाली. कणेरी येथे आजारी महिलेला खुर्चीवरून उचलून मतदानासाठी आणण्यात आले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: