Friday, September 22, 2023
Homeगुन्हेगारीप्रशासनाच्या नाकावर टिच्चून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागून अवैध वाळूचे उत्खनन...

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागून अवैध वाळूचे उत्खनन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यात दिवसानरात्र वाळूचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागे हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या गोवर्धन घाट पुलाच्या नदीपात्रतून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध वाळूचे उत्खनन होत आहे.गेल्या अनेक वर्षापासून हे अवैध उत्खनन खुले आम होत असताना जिल्हा प्रशासना कडून मात्र कसलीच कारवाई होत नाही हे मात्र विशेष..
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळूचे उत्खनन हे मोठ्या प्रमाणात होत असून या अवैध उत्खननामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.

परंतु प्रशासनाच्या डोळ्या देखत दिवसाढवळ्या नदीपात्रातून वाळुवर दरोडा पडत असताना प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी हे पाहत आहे.”काखेत कळसा अन गावाला वळसा” या म्हणी प्रमाणे जर जवळ असलेल्या वाळू चोरावर कारवाई होत नसलं तर संबंध जिल्ह्यातील वाळू चोरावर काय कारवाई होणार असा प्रश्नचिन्ह इथे उपस्थित होत आहे.

नांदेड शहर व परिसरातून अवैध उत्खनन होत असताना जिल्हा प्रशासनाकडून केवळ थातूर मातुर कारवाई करून एक दोन तराफे जाळण्यात येत आहेत. एवढया मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होत असताना शहरात एवढी यंत्रणा असूनही कारवाई होत नाही तर ग्रामीण भागात व परिसरात काय कारवाई होईल…?

संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी हे का कारवाई करित नाहीत जिल्हा पोलीस अधीक्षक् कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय जवळ असूनही जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हे अवैध वाळू उत्खनन होत आहे. खुले आम अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यावर कारवाई होईल काय या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: