Homeराज्यविकासवाडी जवळ ट्रॅक्टरच्या धडकेत पती-पत्नी ठार...

विकासवाडी जवळ ट्रॅक्टरच्या धडकेत पती-पत्नी ठार…

Share

गोकुळ शिरगाव -राजेद्र ढाले

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील विकासवाडी (ता. करवीर) येथील विजयानंद पेट्रोल पंपाच्या नजीक आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एका अज्ञात ट्रॅक्टरने दुचाकीवरून (क्र.के एक २३ ई यु ४१७४) जाणाऱ्या दांपत्यास पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघाताम ते दोघे पती-पत्नी संदीप बापू कोळी (वय ४२) व राणी संदीप कोळी (वय ३५) (दोघे रा. बेनाडी ता. निपाणी जि. बेळगाव, कर्नाटक) गंभीर जखमी झाले दोघांना उपचारात सी. पी. आर.रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

यादरम्यान अपघाताचे मृत संदीप कोळी हे औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार म्हणून काम करीत होते. दरम्यान दोघे पती-पत्नी आपल्या पाहुण्यांच्या कडे गेले होते अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्यामुळे बेनाडी गावावरती शोककळा पसरली असून त्यांच्या त्यांच्यामागे दोन मुले व आई वडील असा परिवार आहे.

अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद संदीप कोळी यांचे सासरे कल्लाप्पा आण्णाप्पा तासशिलदार यांनी दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश पवार करीत आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: