Friday, May 17, 2024
Homeराजकीयमहागाईचा उच्चांक हा सर्वसामान्यांना भूकमारीकडे नेणारा - विद्याताई चव्हाण...

महागाईचा उच्चांक हा सर्वसामान्यांना भूकमारीकडे नेणारा – विद्याताई चव्हाण…

Share

हिंगणा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला जनजागर यात्रा…

नागपूर- हिगंणा -आज गॅस सिलेंडर पासून, भाजीपाला असो अन्नधान्य असो प्रत्येक वस्तू महाग होत चालली आहे ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली महागाई सर्वसामान्य महिलांच्या कुटुंबाला भूकमारी कडे देणारी आहे. भाजपचे नेते सत्तेत येण्या आधी महागाईच्या विरोधात मोठमोठी आंदोलने करीत होते पण आज मात्र मुंग गिळून बसले आहेत.

तरुण-तरुणींच्या हाताला काम नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे पण याकडे केंद्र सरकार असो की राज्य सरकार यांचा तीळ मात्र लक्ष नाही असा घनाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी हिंगणा विधानसभा क्षेत्रात सातगाव वेनानगर येथे झालेल्या जनजागर यात्रेत बोलताना केला.

ही जनजागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून महिलांमध्ये महिलांच्या विविध विषयावर जनजागृती करत असल्याचेही चव्हाण म्हणाल्या.यावेळी राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग, यांनीही आपल्या भाषांनातून भाजप सरकारच्या बेबंधशाहीवर टीकास्त्र सोडले.

मंचकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, राखापा महिला प्रदेश निरीक्षक अशा मिर्गे, जिल्हा निरीक्षक सुरेखा देशमुख, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, युवा नेते सलील देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टाकसांडे, जिल्हा कार्याध्यक्ष राजुभाऊ राऊत, जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना हरडे, जि प सदस्या वृंदा नागपुरे, जि प सदस्या रश्मी कूटगूले,

प.स सभापती सुषमा कावळे, साइन हकीम ,श्यामबाबू गोमासे,प स सदस्य अनुसया सोनवणे,सुनील बोंदाडे, राजेंद्र उईके, अरुणा बंग, सरपंच शारदा शिंगारे,आशा बावणे,उपसरपंच प्रवीणा शेळके आदींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच योगेश सातपुते यांनी सूत्रसंचालन प्रियंका सातपुते तर आभार महिला जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मंगला उरकुडे, ज्योती जीवतोडे, अशा डावरे , वंदना पातोडे,छबु चटप,सोनाली सातपुते, अशा पीदुरकर, रत्नमाला महाकुलकर, माधुरी हाते,रीना निमजे,नीलिमा धामंदे, मालू मोहितकर,सुनीता गोरघाटे, सुनीता भुसारी, पल्लवी कैकाडी,जोशना कोल्हे सातगाव आदींसह सातगाव परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: