HomeBreaking Newsअमेरिकेतील लेविस्टनमध्ये प्रचंड गोळीबार...२२ नागरिकांचा मृत्यू...सुमारे ६० लोक जखमी...आरोपी अटक...

अमेरिकेतील लेविस्टनमध्ये प्रचंड गोळीबार…२२ नागरिकांचा मृत्यू…सुमारे ६० लोक जखमी…आरोपी अटक…

Share

अमेरिकेतील मेन राज्यातील लेविस्टन शहरात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात 22 जणांचा मृत्यू झाला तर 60 हून अधिक जण जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेनंतर संशयित हल्लेखोर फरार झाला होता, मात्र आताच आलेल्या माहितनुसार, ऑबर्न मेनमध्ये मास शूटींग संशयित रॉबर्ट कार्ड याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने विविध ठिकाणावर आतापर्यंत 22+ लोकांना ठार तर 100+ पर्यंत जखमी केलेत.

सीएनएनच्या म्हणण्यानुसार बुधवारी लुईस्टन, मेन येथे झालेल्या सामूहिक गोळीबारात किमान 22 लोक ठार आणि 50 ते 60 जखमी झाले. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एंड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयाने संशयिताची दोन छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. फोटोमध्ये आरोपी गोळीबार करताना दिसत आहे. त्याच्या हातात अत्याधुनिक रायफल दिसत आहे. काऊंटी शेरीफ सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये संशयित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी लोकांची मदत मागत आहे.

लेविस्टन येथील सेंट्रल मेन मेडिकल सेंटरने एक निवेदन जारी केले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, संशयित अनेक ठिकाणी दिसला आहे. एपीच्या मते, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी लोकांना रस्त्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. लेविस्‍टन अँड्रोस्‍कोगिन काउंटीचा भाग आहे आणि मेनच्‍या सर्वात मोठ्या शहर, पोर्टलँडपासून सुमारे 35 मैल (56 किमी) उत्तरेस आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: