Friday, May 17, 2024
HomeSocial Trendingक्रिकेटच्या सामन्यात विकेटकीपरची अशी अप्रतिम स्टंपींग बघितली नसेल?...तेही एकाच षटकात दोन रनऑउट...पाहा...

क्रिकेटच्या सामन्यात विकेटकीपरची अशी अप्रतिम स्टंपींग बघितली नसेल?…तेही एकाच षटकात दोन रनऑउट…पाहा Video

Share

न्युज डेस्क – भारतासह इतर देशातही आता T20 क्रिकेट लीग सुरु झाले असून आपल्या शेजारचा देश नेपाळमध्येही T-20 लीग खेळवली जात आहे. त्याचे नाव नेपाळ T20 आहे. 24 डिसेंबरपासून लीग सुरू झाली. यामध्ये जगातील अनेक मोठे खेळाडूही खेळत आहेत. स्पर्धेतील सहावा सामना जनकपूर रॉयल्स आणि विराटनगर सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात सुपर किंग्जचा यष्टीरक्षक अर्जुन सौदने एकाच षटकात दोन फलंदाजांना धावबाद केले, ज्याची सध्या सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे.

नेपाळमध्ये खेळल्या जाणाऱ्या लीगमध्ये अर्जुन सौदने विकेटच्या मागे केलेल्या अप्रतिम कामगिरीसमोर महेंद्रसिंग धोनीला कदाचित मागे टाकले असेल. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग 18 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. 2020 मध्ये तो निवृत्त झाला पण त्याची छाप अजूनही खेळाडूंवर दिसून येते. पण अर्जुनने जे केले त्याचा धोनीलाही अभिमान वाटायला हवा.

9व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जनकपूरचा फलंदाज (batsman) राजेश पुवाली याने खोलवर चेंडू खेळून दोन धावा काढून पळ काढण्याचा प्रयत्न केला. फिल्डरचा थ्रो विकेटपासून दूर होता. अर्जुनने चेंडू पकडला आणि न पाहता विकेटच्या दिशेने त्याच्या पायांमध्ये फेकला. त्याने थेट दोन पायाच्या मधातून विकेट वर फेकला आणि फलंदाज बाद झाला.

अर्जुन सौद हा 19 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज (wicketkeeper and batsman) आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळला आहे. त्याच वर्षी, तो नेपाळकडून केनियाविरुद्ध पहिला T-20 सामना खेळला. नोव्हेंबरमध्ये त्याला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 125 धावा आणि 3 टी-20 मध्ये 70 धावा केल्या आहेत.

विराटनगर सुपर किंग्जने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 140 धावा केल्या. सिकंदर रझाने 18 चेंडूत 38 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर जनकपूरने सामना जिंकला. चॅडविक वॉल्टनने 69 धावांची नाबाद खेळी खेळली.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: