Homeदेश-विदेशHamas Hostages | हमासने दाखविली माणुसकी...जारी केला अपहरण झालेल्या इस्रायली मुलीचा व्हिडिओ...

Hamas Hostages | हमासने दाखविली माणुसकी…जारी केला अपहरण झालेल्या इस्रायली मुलीचा व्हिडिओ…

Share

Hamas Hostages : हमास या दहशतवादी संघटनेने ऑक्टोबर २०१५ मध्ये इस्रायली सीमेवर हल्ला केला तेव्हा अनेक इस्रायली आणि परदेशी नागरिकांचे अपहरणही केले होते. आता हमासने एका इस्रायली महिलेचा व्हिडिओ जारी केला आहे. हमासची लष्करी शाखा इज्ज अद दीन अल-कासम ब्रिगेडने सोमवारी हा व्हिडिओ जारी केला.

इस्रायल आणि फ्रान्सचे दुहेरी नागरिकत्व असलेली 21 वर्षीय मिया शेम व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओवर इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, दहशतवादी स्वतःला माणूस म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्हिडिओमध्ये मियाच्या दोन्ही हातांवर पट्टी बांधलेली दिसत आहे आणि एक व्यक्ती, ज्याचा चेहरा दिसत नाही, तो मियाच्या हातावर पट्टी बांधत आहे. व्हिडिओमध्ये मिया म्हणते की, ‘हे लोक तिची काळजी घेत आहेत आणि माझ्यावर उपचार करत आहेत. सगळे ठीक आहे.’ मिया म्हणाली, ‘मला लवकरात लवकर माझ्या घरी परत जायचे आहे.

कृपया आम्हाला येथून बाहेर काढा. हमासच्या दहशतवाद्यांनी नुकतेच इस्रायलच्या सेडरॉट शहरातून मियासह अनेकांचे अपहरण केले होते. मिया गाझा सीमेजवळील किबुत्झ रेम येथे सुकुट कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. तिथूनच हमासच्या लोकांनी मियाचे अपहरण केले होते.

इस्रायली लष्कराने सोशल मीडियावर या व्हिडिओवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये IDF ने लिहिले आहे की, ‘मियाचे गेल्या आठवड्यात अपहरण करण्यात आले होते. आयडीएफने मियाच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली होती आणि ते पीडितेच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहेत. हमासने शेअर केलेला व्हिडिओ हा स्वतःला माणूस म्हणून दाखवण्याचा प्रयत्न आहे.

तर ती एक भयानक दहशतवादी संघटना आहे आणि महिला, मुले आणि वृद्ध लोकांच्या हत्या आणि अपहरणासाठी जबाबदार आहे. आयडीएफने सांगितले की ते मियासह अपहरण केलेल्या सर्व लोकांना परत आणण्यासाठी गुप्तचर ऑपरेशन करत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: