Thursday, May 2, 2024
Homeराज्यग्रीनलँड इंग्लिश मीडियम स्कूल आलापल्ली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन...

ग्रीनलँड इंग्लिश मीडियम स्कूल आलापल्ली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन…

Share

अहेरी – उद्घाटन सोहळा – दि. 09,10,11 फेब्रुवारी 2023 ला आलापल्ली येथील ग्रीनलँन्ड इंग्लिश मिडियम स्कुल, आलापल्ली येथे अहेरी तालुका विज्ञान प्रदर्शनी आयोजन करण्यात आले होते. दि. 09 फेब्रुवारी 2023 रोजी उद्घाटन सोहळयाचे अध्यक्ष स्थान श्री मा. राहुल सिंह टोलीया (IFS) उपवनसंरक्षक, वनविभाग आलापल्ली यांनी भुषविले तर, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री शंकर मेश्राम, सरपंच ग्रामपचांयत, आलापल्ली हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून १)श्री मा. रामचंद्र मुंगमोडे, गटशिक्षाधिकारी पंचायत समिती अहेरी, २) श्री मा. जगदिश बोम्मावार, केंद्र प्रमुख केंद्र आलापल्ली, ३) श्री मा. प्रा. श्यामल विश्वास, सहाय्यक प्राध्यापक, राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरी, ४) मा. श्री जगन देवकर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, ५) श्री मा. विनोद अकनपल्लीवार, उपसरपंच ग्रामपंचायत आलापल्ली, ६) श्री मा. सुनिल आईंचवार, केंद्र प्रमुख राजाराम, ७) मा. सौ. वैशाली देशपांडे, मुख्याध्यापक, ग्लोबल मिडीया केरला मॉडेल स्कुल, आलापल्ली,

7) मा. श्री ताराचंद भुरसे, गटसमन्वयक गट साधन केंद्र, अहेरी, 8) मा. सौ. लताताई रंगुवार, उपाध्यक्षा शाळा व्यवसस्थापन समिती, आलापल्ली, 9) मा. श्री सुरेश गड्डमवार, सचिव शाळा व्यवस्थापन समिती आलापल्ली,10) मा. श्री जी. महेश, मुख्याध्यापक ग्रीनलँन्ड इंग्लिश मिडीयम स्कुल, आलापल्ली यांनी भुषविले, तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. श्री रामचंद्र मुंगमोडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कु. स्नेहल जोब सहा. शिक्षिका यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात मा. श्री राहुल सिंह टोलीया यांनी विज्ञानाचे महत्व विद्यार्थ्यांना (भावी वैज्ञानिक) सांगीतले. प्रमुख अतिथीपैकी प्रा. श्यामल विश्वास सर, शंकर मेश्राम सर, श्री महेश सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती दमयंती मारगोनवार यांनी केले. दि. 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रयोग मुल्यमापन – मा. श्री श्यामल विश्वास सर, २) मा. श्री शाहिद शेख सर, तसेच ३) मा. प्रा. खंडाळे सर यांनी केले.

दि. 11 फेब्रुवारी 2023 ला बक्षिश वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले हेाते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मा. श्री राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.गडचिरोली यांनी भुषविले. तर प्रमुख अतिथि म्हणुन १) मा. श्री. रामचंद्र मुंगमोडे, गटशिक्षाणाधिकारी पं.स. अहेरी, २) मा. श्री जगदिश बोम्मावार केंद्रप्रमुख, केंद्र आलापल्ली,दिलीप पाटील दिपस्तंभ संस्थेचे संस्थापक MPSC/UPSC जळगांव, 4) श्री सुनिल आईंचवार केंद्रप्रमुख राजाराम,

5) मा. श्री भांडेकर सर मुख्याध्यापक कृषक विद्यालय चामोर्शी, गजानन लोनबले मुख्याध्यापक राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली, 7) मा. श्री जी. महेश सर मुख्याध्यापक ग्रिललँन्ड इंग्लिश मिडीयम स्कुल आलापल्ली, 8) मा. सौ. लताताई रंगुवार, उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती आलापल्ली, मंगेश परसावार, कोषाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आलापल्ली यांनी भुषविले तर कार्यक्रमाचे अहवाल वाचन श्री रामंचंद्र मुंगमोडे सर यांनी केले तर संचालन कु. स्नेहल जोब तसेच प्रमुख अतिथी प्रा. दिलीप पाटील सर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. अध्यक्षिय भाषण राजकुमार निकम यांनी केले.

सौ. लताताई रंगुवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीश देण्यात आले. तर आभार प्रदर्शन संजय गांधारे सहाय्यक शिक्षक यांनी केले.विजेत्यांची नांवे – प्राथमिक गट 1) कु. निधी गणेश आलाम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजाराम, हया विद्यार्थींनीने प्रथम क्रमांक पटकविले तर द्वितिय क्रमांक कु. तेजस्विनी बलवंत कोंडागुर्ले आणि चमू भगवंतराव हायस्कुल अहेरी यांना मिळाले तर तृतिय क्रमांक श्रीनिवास सुधाकर चव्हाण आणि चमू जि.प.उच्च प्रा.शाळा छल्लेवाडा यांनी पटकाविले तर आदिवासी गटातून प्रथम अक्षद बंडू आत्राम, ग्रिनलँन्ड इंग्लिश मिडीयम स्कुल आलापल्ली यांना मिळाले.

माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक कल्पक सुनिल तोरे आणि चमू, संत प्रान्सिस स्कुल नागेपल्ली तर दिद्वीय क्रमांक विलास चोपादंडीवार आणि चमू, संत प्रान्सिस स्कुल नागेपल्ली यांना मिळाले तर नाजनिन आ. खान आणि चमू राजे धर्मराव हायस्कुल नागेपल्ली यांना मिळाले. आदिवासी गटातून प्रथम क्रमांक निखील सत्तु कोडापे, धर्मराव कृषि विद्यालय अहेरी यांनी पटकाविले.
शिक्षक गट – शिक्षक गटातून प्रथम क्रमांक श्री संजय भास्कर कोंकमुटटीवार, जि.प.प्रा.शाळा, गडअहेरी यांना मिळाले तर दिद्वीय क्रमांक श्री सुरजलाल लिंगाराम येलमुले, जि.प.उच्च प्रा.शाळा छल्लेवाडा यांना मिळाले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: