Saturday, May 4, 2024
Homeसामाजिकअल्पसंख्यांक वर्गाला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लक्षांक मंजूर करा - इमरान खान...

अल्पसंख्यांक वर्गाला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लक्षांक मंजूर करा – इमरान खान मुमताज खान…

Share

पातुर – निशांत गवई

अल्पसंख्यांक वर्गाला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लक्षांक मंजूर करणेबाबत पातुर पंचायत समितीचे उपसभापती इमरान खान मुमताज खान यांनी मा. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे दिनांक 10 एप्रिल 2023 ला निवेदन देऊन तशी मागणी केली आहे.

पातुर तालुका जि.अकोला येथील अल्पसंख्यांक मायनॉरिटी प्रपत्र ड यादीतील पात्र लाभार्थी यादी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडे ग्रामपंचायत निहाय ग्रामपंचायत ने मंजूर करून सादर केलेले आहेत परंतु अद्याप पर्यंत पातुर तालुक्यातील एकही ग्रामपंचायत मध्ये अल्पसंख्यांक मायनॉरिटी करिता प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लक्षांक प्राप्त झाले नाही सदर बाब लक्षात घेता अल्पसंख्यांक या समुदायावर अन्याय होत आहे तरी अल्पसंख्यांक वर्गाकरिता तात्काळ घरकुल लक्षांक मंजूर करून पात्र लाभार्थीना लाभ देण्यात यावे अशी मागणी इमरान खान मुमताज खान पातुर पंचायत समिती उपसभापती यांनी केली आहे.

तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत अल्पसंख्यांक प्रपत्र यादीतील पात्र लाभार्थी यांची यादी ग्रामपंचायत ने मंजूर करून सादर केल्या आहेत अद्याप पर्यंत पातुर तालुक्यातील एकही ग्रामपंचायत मध्ये अल्पसंख्यांक करिता प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लक्षांक प्राप्त झाले नाही हा अल्पसंख्यांक वर्गावर अन्याय असल्याने मी मा.प्रकल्प संचालक जि. ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: