Monday, May 6, 2024
Homeराज्यओबीसी जागर यात्रेचे रामटेक येथे भव्य सभा…

ओबीसी जागर यात्रेचे रामटेक येथे भव्य सभा…

Share

ओबीसी आरक्षण कायम राहावे या करीता ओबीसी जागर यात्रा डाँ. आशिष देशमुख

रामटेक – राजु कापसे

ओबीसी जागर यात्रा रामटेक येथे स्थानिक भाजपा पदाधिकारी व ओबीसी नागरिकांनी जंगी स्वागत यात्रेचे करण्यात आले तसेच गांधी चौक या ठिकाणी सदर यात्रेमध्ये सामील संपूर्ण ओबीसी जनसमुदाय यांना संबंधित करण्याकरिता उपस्थित भाजपा ओबीसी मोर्चा चे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख तसेच ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,

ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव डॉक्टर राजेश ठाकरे तसेच ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ दिवटे, निवडणूक प्रमुख सुधाकर मेंगर तसेच या जनजागर यात्रेच्या आयोजनाकरिता प्रयत्न करणारे राहुल किरपान मंडळ अध्यक्ष रामटेक तसेच पार्श्विनी मंडळ अध्यक्ष योगेश वाडीभस्मे ,लक्ष्मण किनी राजेश जयस्वाल सतीश डोंगरे, नंदू चंदनखेडे, बंटी गुप्ता चंदू बैस, ज्ञानेश्वर ढोक सचिन यादव, नंदू चंदनखेडे, आलोक मानकर, धर्मेंद्र शुक्ला, बैजू खरे, नंदू कोहळे, लता कांबळे,

वनमाला चौरागडे ,ज्योती कोल्हेपरा सर्व जिल्हाप्र सदस्य नगरसेवक आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता प्रयत्न केले तसेच स्थानिक ओबीसी बांधवासह सह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी सहभागी होते याप्रसंगी केंद्र व राज्याच्या विविध योजना ओबीसीच्या तसेच बारा बलुतेदार १८ पगड जाती यांच्याकरिता केंद्र सरकारने लागू केलेली विश्वकर्मा योजना व इतर राज्य सरकारच्या ओबीसी विद्यार्थ्यांकरिता करिता तत्काळ होस्टेलची मागणी तसेच स्कॉलरशिप भरीव निधीची मागणी,

विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्याकरिता स्कॉलरशिप तसेच विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाला सुद्धा राज्य सरकारने मान्यता दिलेली असून भाजपा महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार हे ओबीसी करिता सकारात्मक असून ओबीसीतील सगळे घटकांमधील ४०० जातीच्या समूह हा आरक्षणात सुरक्षित ठेवण्याचा उद्देश सरकारने कायम ठेवलेला आहे व महाराष्ट्रात इतर वंचित जाती आरक्षणापासून वंचित असतील तर त्यांना आरक्षण देत असताना कुठल्याही प्रकारे ओबीसीला किंवा एससी एसटीला धक्का लागणार नाही याची काळजी पूर्णपणे सरकार ने घेतली असल्याची कबुली दिनांक २९ सप्टेंबर 2023 ला ओबीसी बांधवां व सरकार यांच्यामध्ये झालेला बैठकीत विविध २२ मागण्या पूर्ण करण्यात आल्या तसेच त्या संदर्भातील अंमलबजावणी येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे राज्य सरकारने ग्वाही दिलेली असल्याचे सुद्धा या सभेत सांगण्यात आले.

तसेच ओबीसी बांधवांकरिता तसेच बारा बलुतेदार १८ पगड जाती मधील लोहार शिंपी माली माडी मिस्त्री कुंभार चांभार या सर्व जाती करिता व्यवसाय उभारण्याकरिता लाखो रुपयांच्या योजना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत त्याचा फायदा ऑनलाइन अर्ज करून लवकरात लवकर घ्यावा अशा प्रकारचे आवाहन सुद्धा याप्रसंगी जागर यात्रेच्या माध्यमातून करण्यात आले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: