Monday, December 11, 2023
HomeMarathi News Today१२ हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' चायनीज फोनवर सरकार घालणार बंदी…जाणून घ्या...

१२ हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या ‘या’ चायनीज फोनवर सरकार घालणार बंदी…जाणून घ्या…

Spread the love

भारतात चिनी मोबाईल कंपन्यांवर मोठी कारवाई झाल्याची बातमी आहे. 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या चायनीज फोनवर भारतात बंदी घालण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ब्लूमबर्गच्या एका अहवालात, सरकारने हा निर्णय लावा, मायक्रोमॅक्स सारख्या देशांतर्गत कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे Xiaomi, Vivo, Oppo, Poco, Redmi, Realme सारख्या कंपन्यांना मोठा झटका बसला आहे, जरी या प्रकरणी सरकार किंवा कोणत्याही चीनी कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
सरकारच्या या निर्णयामागे एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये देशांतर्गत कंपन्यांचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा आहे.

भारत सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे, परंतु चिनी कंपन्यांचा कब्जा आहे. या चिनी कंपन्यांपुढे देशांतर्गत कंपन्या टिकू शकत नाहीत. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंटच्या मते, जून 2022 पर्यंतच्या तिमाहीत भारताच्या विक्रीपैकी $150 पेक्षा कमी स्मार्टफोनचा वाटा एक तृतीयांश होता आणि शिपमेंटमध्ये 80% वाटा चिनी कंपन्यांचा आहे.

सरकारच्या या निर्णयाचा सॅमसंग आणि अ‍ॅपलला मोठा फायदा होणार आहे. सॅमसंग आपले स्मार्टफोन सतत मिडरेंज आणि एंट्री लेव्हलमध्ये देऊ शकतील, तर Apple देखील मिडरेंजमध्ये पुढे जाऊ शकते. Vivo, Oppo आणि Xiaomi सारख्या कंपन्या आधीच आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. या कंपन्यांवर करचुकवेगिरीचे आरोपही आहेत. अलीकडेच या कंपन्यांवर ईडीचे छापेही पडले आहेत.

349 चीनी अ‍ॅप्सवर बंदी
याआधी 2020 मध्ये सरकारने एकावेळी सुमारे 60 चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घातली होती आणि त्यानंतर अनेक वेळा चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. आतापर्यंत ३४९ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. अलीकडेच, सरकारच्या आदेशानंतर PUBG चा नवीन अवतार Battlegrounds Mobile India Google Play-store आणि Apple च्या अ‍ॅपवरून काढून टाकण्यात आला आहे. बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाला स्टोअरमधून काढून टाकण्याबाबत कंपनीने म्हटले आहे की, अ‍ॅपवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली नाही, परंतु ते तात्पुरते ब्लॉक करण्यात आले आहे. अ‍ॅप लवकरच परत येईल.


Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: