Monday, May 27, 2024
Homeमनोरंजनगावगाता गजाली, वेतोबा फेम कलाकार विकतोय कुडाळ बसस्थानक परिसरात चहा...

गावगाता गजाली, वेतोबा फेम कलाकार विकतोय कुडाळ बसस्थानक परिसरात चहा…

गणेश तळेकर

आम्ही संध्याकाळी थोडा वेळ घालवण्यासाठी कुडाळ बस स्टँड च्या समोर असलेल्या सेल्फी पॉंईंटवर बसलो होतो. गप्पा मारता मारता आमच्या पैकी मनोजचा लक्ष एका चहावाल्यावर गेला.त्याचे केस बर्यापैकी वाढलेले होते.

लाल टि शर्ट घालून तो एका थर्मास मधून चहा विकत होता. त्याला कुठेतरी बघीतल्या सारखे वाटत होते नव्हे कन्फॉर्म त्याला टिव्ही वर पाहिले होते. मनोज आम्हाला सांगत होता पण टिव्हीवर काम करणारा ईकडे कशाला चहा विकेल..?

आम्ही त्याला वेड्यात काढले. पण मनोज अस्वस्थ झाला तो उठला आणि आजूबाजूच्या रिक्षा वाल्यांकडे चौकशी करायला गेला.त्या परिसरातले सगळेच त्याला ओळखत होते. तो होता ‘देवा’ चहावाला.त्याने मराठी हिंदी सिरीयल मध्ये काम केले हे कन्फॉर्म झाले.

शेवटी त्याला शोधायला आम्ही निघालो. बाजार पेठेत त्याला शोधल्यावर एका ठिकाणी चहा विकताना तो आम्हाला सापडला. आम्ही त्याच्या कडून चहा घेतला आणि सहज मुद्द्याला हात घातला.तर तो खुश झाला. पण त्याच्या कामाची वेळ असल्याने आम्ही त्याला काम संपल्यावर सेल्फी पॉंईंटवर यायला सांगितले.

थोड्यावेळाने तो चहाचा थर्मास आणि हातात पेपर कप घेऊन आला आणि आमच्याशी गप्पा मारू लागला. तो होता ‘देवा रेडकर’. त्याने गावगाता गजाली, वेतोबा या सिरीयल मध्ये काम केले आहे. ९ मराठी हिंदी चित्रपटात छोटी मोठी कामे केली आहेत. देवा अमिताभ बच्चन यांचा फॅन आहे.

त्यांच्या आवाजात मिमिक्री करतो. किशोरदांच्या आवाजात गातो. अनेक छोटे मोठे कार्यक्रम करतो. त्याच्याशी बोलताना अभिनय त्याच्या नसानसांत असल्याचे जाणवते.

पण त्याला नेहमीच काम मिळत नाही म्हणून तो कुडाळ बस स्थानक परिसर आणि कुडाळ बाजारपेठेत चहा विक्री करून आपल्या संसाराचा गाडा रेटतो. तरीही तो अत्यंत खुश असतो. अभिनय करताना पैश्यापेक्षा काम महत्वाचे मानतो. मोठी संधी किंवा सतत काम मिळण्याच्या अपेक्षेत तो आहे.

कुडाळात कधी आलात तर देवा ला नक्की भेटा.. कोणी नाटक सिरीयल सिनेमात काही काम असेल तर त्याला ऑफर करा. त्याचा मोबाईल नंबर-देवा रेडकर (9764138430) आपल्या एका हरहुन्नरी मालवणी कलाकारला सगळ्या पर्यंत पोहचवा.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments