Homeगुन्हेगारीजोधपूरमध्ये लग्न समारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट...४ जणांचा मृत्यू...६० हून अधिक जखमी...

जोधपूरमध्ये लग्न समारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट…४ जणांचा मृत्यू…६० हून अधिक जखमी…

Share

न्युज डेस्क – राजस्थानमधील जोधपूरच्या भुंगरा गावात गुरुवारी एका लग्न समारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात लग्न समारंभात सहभागी झालेले 60 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर लग्नसमारंभात गोंधळ उडाला होता. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर पाण्याच्या टँकरसह अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले.

मिरवणुकीपूर्वी स्फोट झाला
एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणूक भुंगरा येथून निघण्यापूर्वी गुरुवारी ही घटना घडली.

गुप्ता म्हणाले, “भुंगरा गावात लग्नादरम्यान एका घराला आग लागल्याने सुमारे 60 लोक जखमी झाले. हा अत्यंत गंभीर अपघात आहे. 60 जखमींपैकी 42 जणांना एमजीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू आहेत.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: