Friday, May 17, 2024
Homeगुन्हेगारीSpanish Woman | स्पॅनिश महिला पर्यटकावर झालेल्या सामुहिक बलात्काराने हादरला देश…

Spanish Woman | स्पॅनिश महिला पर्यटकावर झालेल्या सामुहिक बलात्काराने हादरला देश…

Share

Spanish Woman : देशाला कलंकित करणारी घटना झारखंडमधील दुमका येथे घडली. दोन दिवसांआधी भारतात भटकंतीसाठी आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. आता गँगरेप पीडितेने कथन केलेल्या घटनेची भयावह कहाणी ऐकून अंगावरील काटा उभा राहील.

स्पॅनिश पीडित महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की घटनेदरम्यान सात आरोपी तिला सतत लाथा मारत होते. एवढेच नाही तर पीडित विदेशी महिलेने सांगितले की, ‘बलात्काराचा आरोपी तिच्या पतीचे हात बांधून मारहाण करत होता.’

ती महिला म्हणाली, ‘मला वाटले की आरोपी मला त्या रात्री मारतील पण देवाच्या कृपेने मी अजून जिवंत आहे.’ दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशन परिसरात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराची ही घटना घडली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास केला.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: