Friday, May 17, 2024
Homeराजकीयमाजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी रुग्णवाहिका व आर्थिक मदत देऊन कोंडागुर्ला परिवाराला...

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी रुग्णवाहिका व आर्थिक मदत देऊन कोंडागुर्ला परिवाराला दिला आधार…

Share

अहेरी तालुक्यातील मल्लमपल्ली येथील सुशिक्षित बेरोजगार युवक रमेश कोंडागुर्ला आपल्या क्षेत्रात हाताला रोजगार मिळत नाही म्हणून पुणे येथे काम करण्यास गेला असताना अपघाती निधन झाले होते.घरची परिस्थिती खूप हलाखीची असल्याने त्यात रमेश कोंडागुर्ला यांचे शव पुणे येथे होते.

या परिस्थिती मध्ये वसंत कोंडागुर्ला यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी पुणे येथील पोलीस विभाग व आरोग्य विभागासोबत संपर्क करून शव मल्लमपल्ली येथे आणण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून घरच्या लोकांना पुणे येथे जाण्यासाठी आर्थिक मदत केली.

या वेळी आविस चे नागेपल्ली माजी सरपंच दिवाकर मडावी,नागेपल्ली ग्राम पंचायत सदस्य आशिष पाटील,मल्लमपल्ली पोलीस पाटील किशोर सिडाम,जीवन दुर्गे जुलेख शेख,विनोद कावेरी माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.
कोंडागुर्ला परिवारावर आलेल्या संकटात माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मल्लमपल्ली येथील जनतेनी आभार व्यक्त केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: