Friday, May 17, 2024
Homeराज्यसमता परिषद व रासप तर्फे माजी मंत्री जानकर यांचा सत्कार...

समता परिषद व रासप तर्फे माजी मंत्री जानकर यांचा सत्कार…

Share

मालेगाव – चंद्रकांत गायकवाड

माजी मंत्री तथा आमदार महादेवराव जानकर यांचा सत्कार ता 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता मालेगाव शहरातील अकोला फाटा येथील सावित्रीबाई फुले चौकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रीय समाज पक्षातर्फे करण्यात आला.

आ जानकर पातूर येथील कार्यक्रमाला जात असताना त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी केला. यावेळी बोलताना आ जानकर म्हणाले की आगामी निवडणूकित मूळ ओ बी सी ,बारा बलुतेदार यांनी आपली शक्ती ओ बी सी च्या च मागे उभी केली पाहिजे त्यासाठी समता परिषद व रासप ने एकत्रित पणे कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे ,रासपचे जिल्हा अध्यक्ष माधव दळवी पाटील जिल्हा सचिव संदीप गावंडे रिसोड तालुकाप्रमुख नितीन बनसोड ,समता परिषदेचे तालुका अध्यक्ष कपिल भालेराव ,तालुका प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत गायकवाड ,इम्रान खान ,सुभाष बळी ,रवी बळी सामाजिक कार्यकर्ते विजय शेंडगे दिपक सारडा ,लोकेश भागवत ,आदी उपस्थित होते,


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: