Monday, May 13, 2024
Homeराज्यजुनी पेंशन साठी एकवटला शिक्षक कर्मचारी वर्ग...काटोल तालुक्यातील अनेक शाळा... कार्यालय ओस...

जुनी पेंशन साठी एकवटला शिक्षक कर्मचारी वर्ग…काटोल तालुक्यातील अनेक शाळा… कार्यालय ओस…

Share

नरखेड – अतुल दंढारे

महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना यांनी २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू व्हावी या मुद्द्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

तहसील कार्यालय समोर हजारोंच्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.एकच मिशन. जुनी पेंशन. पेंशन आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची. या घोषणेने परिसर दणाणला.
यानंतर नायब तहसीलदार विजय डांगोरे, गटविकास अधिकारी संजय पाटील व मुख्याधिकारी धनंजय बोरीकर आदींना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

यावेळी राजेंद्र टेकाडे,राधा चौहान, प्रा.अजय खडसे,प्रशांत पिंपळकर, प्रा.परेश देशमुख,विलास काळमेघ, वैशाली बोरकर, एकनाथ खजुरीया, संजय वंजारी, योगेश राऊत, घनश्याम भडांगे,कांचन कोरवाते,योगेश गायकवाड, संजय राऊत,महेंद्र साव, गिरीष उईके,राजू ठोबरे, कमलेश कुंभरे, उमप आदी उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: