Friday, May 17, 2024
Homeसामाजिकभांडुपमध्ये प्रथमच "तृतीयपंथीयासाठी आरोग्य शिबीर" कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला...

भांडुपमध्ये प्रथमच “तृतीयपंथीयासाठी आरोग्य शिबीर” कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला…

Share

तृतीयपंथींयांच्या आरोग्य विषयी विचार करता विविध डॉक्टर्स ची टीम आणि नर्स यांचा सहभाग होता.

भांडुपच्या यशवंत चांदजी सावंत शाळेच्या पटांगंणात या आरोग्य शिबीराची व्यवस्था केली गेली होती. भर पावसात कल्याण, ठाणे, मुलुंड,भांडुप भिवंडी,सायन येथून आलेल्या सर्व तृतीयपंथीयांना मोफत आरोग्य तपासणी सोबत रेशनींग किट देण्यात आले. व नंतर त्यांच्या अल्पोहार, उत्तम भोजनाची ही व्यवस्था केली होती

देवामृत फॉउंडेशनच्या प्रिया जाधव मॅडम यांनी अगोदर देखील भांडुप मध्ये “जागतिक तृतीयपंथी दिवस ” साजरा केला होता.त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्या तृतीयपंथीयांना सातत्याने सहकार्य करत असतात. त्यांनी याही कार्यक्रमात 100 हुन अधिक तृतीयपंथीयांना एकत्र आणून त्यांना महत्वपूर्ण आरोग्य शिबीराचा लाभ दिला.या उपक्रमास आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक संपर्कात होती.

संपूर्ण तृतीयपंथीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मुबंई युनिव्हर्सिटी मधून पहिल्या तृतीयपंथी पदवीधर झालेल्या श्रीदेवी यांनी खूप मेहनत घेतली. व कार्यक्रमात प्रिया जाधव मॅडम सोबत महत्वपूर्ण भूमिका बजावली.

भांडूप मध्ये कार्यरत असतानाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन उन्हवणे साहेब, मनसेच्या रिटा ताई गुप्ता , श्रद्धा तावडे, राजन गावडे व संदीप जळगावकर साहेब, आणि लव क्षीरसागर , भांडूप कलाकार कट्टा यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व तृतीयपंथीयांनी आम्हाला खूप आनंद होतोय आणि आमच्या सारख्या दुर्लक्षित लोकांना मदतीचा हातभार लावून, समाजाला आमच्या गरजा, वेदना कळण्या साठी असे कार्यक्रम केले गेले पाहिजेत असे सांगितले.

तृतीयपंथीयानां ही कला, शिक्षण, घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि इतरही नोकरी, व्यवसाय याकरिता संधी दिली पाहिजे असे सर्व मान्यवरांनी मोठेपणाने कबूल केले.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: