Homeराज्यडिजिटल मीडियातील पत्रकारांच्या प्रगतीसाठी, डिजिटल मीडिया परिषद खंबीरपणे काम करेल - अनिल...

डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या प्रगतीसाठी, डिजिटल मीडिया परिषद खंबीरपणे काम करेल – अनिल वाघमारे…

Share

सांगली – ज्योती मोरे

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेली डिजिटल मीडिया परिषद ही संस्था डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या सन्मान आणि प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केला.

तर येणाऱ्या काळात जनजागृतीसाठी प्रिंट मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे यांनी केले. कर्जत येथे होणाऱ्या अ भा मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट यांनी केले आहे.

कर्जत जिल्हा अहमदनगर येथे दि 7 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय मेळावा आणि पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बीडच्या शासकीय विश्रामगृह येथे 27 मार्च रोजी आयोजित डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट, जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ धनवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविक करताना जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे म्हणाले की, अ भा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी भविष्याचा वेध घेऊन डिजिटल मीडिया परिषदेची निर्मिती केली आहे. येणाऱ्या काळात जनजागृतीसाठी प्रिंट मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. त्यामुळे युट्युब चॅनल आणि पोर्टलचे काम करणाऱ्या पत्रकार बांधवांनी डिजिटल मीडिया परिषदेचे सदस्य होऊन नियोजनबद्ध काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

पुढे बोलताना राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे म्हणाले की, पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस एम देशमुख सर यांनी प्रिंट मीडियातील पत्रकारांसह डिजिटल मीडियात जनहितासाठी काम करणाऱ्या पत्रकारांनाही कायद्याचे संरक्षण मिळावे, आरोग्य विषयक सुविधा मिळाव्यात आणि शासनाच्या योजनांचाही लाभ मिळावा यासाठी काम सुरू केले आहे. सन्मानपूर्वक आणि प्रगतीसाठी डिजिटल मीडियातील पत्रकारांनी डिजिटल मीडिया परिषदेच्या छत्राखाली येऊन काम करावे असे आवाहन केले.

डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट यांनी, 7 एप्रिल रोजी “राईटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र”, एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथे होणाऱ्या अ भा मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय मेळाव्यास, बीड जिल्ह्यातील सर्व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संग्राम धनवे यांनी यूट्यूब चैनल सुरू करण्यापासून ते फॉलोवर्स वाढविण्यापर्यंत सखोल मार्गदर्शन केले. डिजिटल मीडिया परिषदेचे गेवराई तालुका सचिव सोमनाथ मोटे यांनी सर्वांचे आभार मानले.

या जिल्हास्तरीय बैठकीस सुभाष शिंदे, श्याम जाधव, गणेश ढाकणे,ऍड जोगोजी साबणे, रामदास तपसे, नागेश औताडे, अमोल भांगे, इम्रान सौदागर, विजय आरकडे, गौतम बचुटे, अजय भांगे, मुबशीर खतीब आदींसह बीड जिल्ह्यातील डिजिटल मीडिया परिषदेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: