Thursday, May 2, 2024
Homeराज्यमुदखेड नांदेड रोडवरील मालवाहू ट्रक व ऑटोच्या अपघातात पाच जण ठार...

मुदखेड नांदेड रोडवरील मालवाहू ट्रक व ऑटोच्या अपघातात पाच जण ठार…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

मुदखेड ते नांदेड रोडवरील मुगट येथील पेट्रोल पंपाजवळ आज दिनांक 30 मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक व ऑटोच्या भीषण अपघातात चार जण मृत्यू पावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मुदखेड येथून नांदेड कडे जाणाऱ्या ऑटो क्र. एच एच. 26 टी 7697 या ऑटो व नांदेडहून मुदखेड कडे येणाऱ्या मालवाहू ट्रक क्र.एम.एच 24 ए.बी.7059 या ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात ऑटोमध्ये प्रवास करित असलेले एक पुरुष , दोन महिला व एक लहान बालकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून यात सरोजा भोई वय.40 रा.मेहकर, गाली कल्याण भोई, वय 24 रा.गेवराई बीड जोयल कल्याण भोई रा.गेवराई,बीड आणी पुंडलिक पोलाटकर वय 70 रा.सावरगाव माळ, भोकर यांचा समावेश आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तींना मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल कण्यात आले आहे.

तर जखमी प्रवासींना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उपचारा दरम्यान मुदखेड तालुक्याती ईजळी येथील विद्या हटकर वय 37 या महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: