Friday, May 17, 2024
Homeराज्यनागरिकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य : आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद...

नागरिकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य : आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली…

Share

गडचिरोली – मिलिंद खोंड

नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील आव्हानांना पेलण्यासाठी सक्षम असल्याचे मत गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी व्यक्त केले. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करून त्यांच्या मार्फत लोकांकडून आलेल्या तक्रारी,सुचना स्वीकारून समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना म्हटले.

आयुषी सिंग यांनी रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला अगोदर पालघर जिल्ह्यात जव्हार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.त्यांचा नुकतेच 21 जुलै रोजी झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.त्यांनी आज 31 जुलै रोजी त्यांनी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नुकतेच कार्यभार हाती घेतला असून गडचिरोली जिल्ह्याचा सध्या अभ्यास सुरू असून लवकरच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन विविध विभागाचे कामकाज पाहणार आहे.जिल्ह्यात विविध विभागात रिक्त पदांची समस्या असल्याची माहिती मिळाली आहे.लवकरच पद भरतीसाठी प्रयत्न केले जाणार असून नागरिकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

एवढेच नव्हेतर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना प्रत्येक कामासाठी जिल्हा मुख्यालयात येणे शक्य होत नाही त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि सोडविणे हे आद्य कर्तव्य असून लवकरच नागरिकांना थेट संपर्क करता यावे यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात येणार आहे.

जेणे करून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार.सर्वच गोष्टी सहज मिळाले तर काम करण्यात मजा नसते त्यामुळे आव्हानांना पेलण्याची तयारी देखील आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: