Homeराज्यमहागाव येथील राकेश मडावी यांना उपचाराकरिता अर्थिक मदत...

महागाव येथील राकेश मडावी यांना उपचाराकरिता अर्थिक मदत…

Share

अहेरी येथील महागाव बु चे रहिवासी राकेश अनिल मडावी वय 28 असुन यांची अचानक प्रकृती बिघडली त्यामुळें त्याच्या कुटुंबीयांकडे उपचाराकरिता पुरेसे पैसे नसल्याची माहिती उप सरपंच संजय अलोने यांना माहिती मिळताच ग्राम पंचायत महागाव बुजुर्ग चे सचिव अनिल बंडावर व उपसरपंच संजय अलोने यांनी पुढील उचाराकरीता त्यांच्या कुटुबीयांना कडे अर्थिक मदत केली आहे.

आठवड्यात पूर्वी महागाव बुजुर्ग येथील कुंभारे दाम्पत्याचे वाहन चालक होते, कुंभारे दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडली असल्यामुळें त्यांना चंद्रपुर येथे दवाखान्यामध्ये गेले होते. त्या नंतर कुंभारे दाम्पत्याची अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली.

त्या पाठोपाठ त्याच्या मुलीचा देखील निधन झाले, या दिवसापासून राकेश मडावी त्याची प्रक्रूती अधिकच खालावली त्यामुळे त्याला चंद्रपुर येथील खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले. राकेशचे घरी आई व बहीण आहे.

गरिब परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजंदारीने चारचाकी वाहने चालविण्याचे काम राकेश करीत होता. कुंभारे दाम्पत्य यांना खाजगी रूग्णालयात सोडून आल्यापासून प्रकृती खराब झाली.

राकेश घर चालविण्याची जबाबदारी होती, अर्थिक परिस्थीत हलाखीची असल्यामुळें पुढील उपचाराकरिता अर्थिक मदत म्हणून गावचे उपसरपंच अलोने व सचिव बंडावार यांनी आर्थिक मदत केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: