Homeगुन्हेगारीअखेर सराईत गुन्हेगार जगदीश गायकवाड तुरुंगात ५ दिवसांची पोलिस कस्टडी...

अखेर सराईत गुन्हेगार जगदीश गायकवाड तुरुंगात ५ दिवसांची पोलिस कस्टडी…

Share

किरण बाथम/कोकण ब्युरो चीफ

आंबेडकर घराणे तसेच त्यांचे कुटुंबियांना सदस्यांबाबतीत वादग्रस्त वक्तव्य क्लिप प्रकरणातील पुर्व आरपीआय नेते जगदीश गायकवाड अखेर आज तुरुंगात गेले. वास्तविक दि.22/11/2022 रोजी जगदीश गायकवाड व त्याच्या सहका-याकडुन झालेल्या प्रकाराबद्दल त्याला दि.30/11/2022 रोजी हजर केले होते.तेव्हाच दि.3/12/2022 पर्यत पोलिस कोठडी सुनावली होती.

मात्र हाॅस्पीटल मध्ये दाखल राहुन सहज जामिन घेण्याचा फिल्मी डाव त्यांनी आखला.सरकारी वकील ननावरे साहेब व फिर्यादी सुशिल जाधव, हरेश गायकवाड व त्याचे वकील अॅड. कैलास मोरे यानी दि.3/12/2022 रोजी डाव हाणुन पाडला होता.

अखेर आज तब्बल 20 दिवसानंतर जगदीश गायकवाड यास बंदिस्त व्हॅन मधुन हजर केले असता त्याला न्यायालयाने दि.23/12/2022 पर्यत म्हणजे 5 दिवस पोलिस कस्टडी दिली आहे. आजच्या सुनावणीसाठी सरकारी वकील अमर ननावरे, फिर्यादी सुशिल जाधव, व फिर्यादीके वकील अॅड कैलास मोरे हे हजर होते.
घटनेमुळे लाखों आंबेडकरप्रेमी संतप्त झाले होते. अनेक निदर्शने झाली होती.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: