Thursday, May 2, 2024
HomeBreaking Newsअखेर संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल...

अखेर संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल…

Share

संभाजी भिडे यांच्या एका वादग्रस्त विधानाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. एवढच काय तर काँग्रेसने विधिमंडळात भिडेच्या ताकेची मागणी सुद्धा केली होती होती.अखेर त्यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका कोणत्या कलमानुसार गुन्हा दाखल केला हे पोलिसांकडून सांगण्यात आले नाही.

संभाजी भिडे यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळाले. ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. तर अनेक ठीकांनी आजही निदर्शने सुरु आहेत. भिडे यांच्या अटकेची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आली. आता अखेर भिडेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

संभाजी भिडे हे काल अमरावतीत एका कार्याक्रमानिमित्य आले असता युवकांना संबोधित करतांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वडीलांबद्द्ल बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. महात्मा गांधी यांच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवलेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.

संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काल सभागुहात केली होती.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: