Saturday, May 4, 2024
Homeराज्यगडचिरोली | कृषिदूतांनी प्रभातफेरी काढून शेतकऱ्यांमध्ये केली जनजागृती व महिलांच्या योजना पुस्तिकेचे...

गडचिरोली | कृषिदूतांनी प्रभातफेरी काढून शेतकऱ्यांमध्ये केली जनजागृती व महिलांच्या योजना पुस्तिकेचे वितरण…

Share

गडचिरोली – ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमा अंतर्गत कृषी महाविद्यालय सोनापूर गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी हिरापूर गावात स्वतंत्र दिनी शेतकऱ्यांची प्रभातफेरी काढून जनजागृती केली. हा कार्यक्रम अकोला येथील डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांनी कृषिदूत म्हणून राबविला.

महिलांच्या सक्षमीकरण योजनेची विदयार्थ्यांनी माहिती देऊन .महिलांच्या योजना व कृषी संवादिनी या पुस्तिकेचे वितरण गावकऱ्यांना करण्यात आले. यावेळी हिरापूरच्या सरपंच शालिनीताई कुमरे,उपसरपंच दिवाकर नीसार, मुख्याध्यापक साखरे,ग्रामरोजगार सेवक अशोक निसार आदीची.उपस्थिती होती.

हा कार्यक्रम कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व सर्व प्राध्यापक वर्ग आणि कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली च्या सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी साहिल आत्राम,निखिल खोरेले, प्रीतिश गेडाम, विद्या वेलादी,आचल काटेंगे,श्रुती मडावी यांनी यशस्वी केला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: