Friday, May 3, 2024
HomeSocial Trendingशेतकऱ्याचा जुगाड...रात्री डीजे वाजवून केली गहू पिकाची कापणी...पाहा Video

शेतकऱ्याचा जुगाड…रात्री डीजे वाजवून केली गहू पिकाची कापणी…पाहा Video

Share

न्युज डेस्क – सध्या गहू काढणीचा सीजन सुरू असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. पिकांची काढणी करताना शेतकऱ्यांचे मनोरंजन व्हावे काम करताना उत्साह वाढवा यासाठी गव्हाची काढणी करतानाचा चक्क DJ लावून काढणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

डीजेच्या मिणमिणत्या दिव्यांनी शेत उजळून निघाले होते आणि त्याच्या दमदार संगीताने शेतकऱ्यांचा पीक काढण्याचा उत्साह कायम होता. डीजेवर ‘चुनी में…’ हे गाणे पूर्ण आवाजात वाजत असून महिला आणि पुरुष लावणी (पीक कापणी) करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील असल्याचा दावा केला जात आहे.

हा व्हिडिओ 27 मार्च रोजी इन्स्टाग्राम यूजर ‘सोनू चौधरी’ने पोस्ट केला होता, ज्याला बातमी लिहिपर्यंत 3 लाख 71 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर शेकडो युजर्स कमेंट करत आहेत. मलाही यायचे आहे, असे एका व्यक्तीने लिहिले. दुसऱ्याने लिहिले – यो हरियाणा है प्रधान. तर काहींनी असे लिहिले की, संपूर्ण वातावरण तयार झाले आहे. त्याचप्रमाणे काही युजर्सनी आनंदही घेतला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: