Friday, May 10, 2024
Homeगुन्हेगारीमाजी मंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर...पण...

माजी मंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर…पण…

Share

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी याचिकेवर ८ डिसेंबरपर्यंतचा निकाल राखून ठेवल्यानंतर आज निकाल दिला. अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात १३ महिने तुरुंगात होते.

अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. पण सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्याची तयारी दाखवली आहे. या प्रकरणी सीबीआय सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाला तुर्तास स्थगिती देण्याची विनंती कोर्टासमोर करण्यात आली. त्यामुळे देशमुखांना जामीन मिळाला असला तरी जेलबाहेर येण्याचा त्यांचा मार्ग अद्याप खुला झालेला नाही. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल.

अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर ईडीनेही सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मागितला होता. तसंच आता सीबीआयनेही सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मागितला आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: