Thursday, April 25, 2024
HomeHealthEvolve28 | मानसिक आरोग्‍य सुधारण्‍यासाठी 'ईव्‍हॉल्‍व्‍ह२८' लाँच...पुरेशी झोप देत तणाव कमी करण्यास...

Evolve28 | मानसिक आरोग्‍य सुधारण्‍यासाठी ‘ईव्‍हॉल्‍व्‍ह२८’ लाँच…पुरेशी झोप देत तणाव कमी करण्यास करते मदत…

Share

Evolve28 एथर माइण्‍डटेक या भविष्‍यकालीन हेल्‍थ-टेक कंपनीने भारतातील पहिले नॉन-इन्‍वेसिवह वीअरेबल डिवाईस ईव्‍हॉल्‍व्‍ह२८ लाँच केले आहे. पुरेशी झोप देत, तणाव कमी करत आणि वापरकर्त्‍यांच्‍या सोयीनुसार काम आणि जीवनामध्‍ये संतुलन राखत मानसिक स्थिती सुधारण्‍याचे या उत्पादनाचे लक्ष्‍य आहे.

हे अद्वितीय डिवाईस वापरकर्त्‍यांना मानसिक स्थितीसंदर्भात जीवनास अनुकूल सवयी निर्माण करण्‍यास, उत्तमप्रकारे ध्यान केंद्रित करण्‍यास आणि मूड उत्‍साहित करण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. ब्रेनवेव्‍ह प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून ते सर्वोच्‍च भावनिक, संज्ञानात्‍मक आणि सामाजिक स्‍वास्‍थ्‍याला अनलॉक करते, तसेच औषधोपचार किंवा सप्‍लीमेंट्सची गरज असलेली गंभीर स्थिती निर्माण करण्‍याला प्रतिबंध करते. याची गुणवत्ता आणि प्रभावाचा पुरावा म्हणून हे उत्पादन एफसीसी (यूएसए) सीई (युरोप), डब्ल्यूपीसी (भारत) आणि आयएसईडी (कॅनडा) द्वारा प्रमाणित केले गेले आहे.

ईव्‍हॉल्‍व्‍ह२८ येथील संकल्‍पना व तंत्रज्ञानाचे संचालक पी व्‍ही श्‍यामसुंदर म्हणाले, ”अलिकडील काळात मानसिक आरोग्‍यसंबंधित समस्‍यांमध्‍ये व्‍यापक वाढ झाली आहे. उद्योगामध्‍ये डिजिटल हेल्‍थ ट्रॅकर्सना सादर केले जात असले तरी वास्‍तविक समस्‍यांना ओळखण्‍यासह त्‍यांचे निराकरण करणाऱ्या नाविन्‍यतेवर आमचे लक्ष केंद्रित आहे. ईव्‍हॉल्‍व्‍ह२८ या मुलभूत समस्‍येचे निराकरण करण्‍याच्‍या आमच्‍या प्रयत्‍नामधून डिझाइन करण्‍यात आले आहे. हे डिवाईस प्रमाणित असून वापरण्‍यास सुरक्षित आहे आणि अत्‍यंत गुणकारी आहे. हे डिवाईस ब्रेन स्‍टेम उत्तेजित करण्‍यावर लक्ष केंद्रित करते, ज्‍यामुळे मानसिक स्थिती उत्तम राहते. हे आरोग्‍यदायी व उत्‍साही देशाच्‍या सहयोगात्‍मक दृष्टिकोनाप्रती उद्योगामधील पहिले डिवाईस आहे.”

चार वर्षांपर्यंत व्‍यापक संशोधन व विकास केल्‍यानंतर लाँच करण्‍यात आलेले विज्ञानाचे पाठबळ असलेले उत्‍पादन मानेभोवतीच्‍या ब्रेन स्‍टेमपर्यंत व्‍हेरिएबल कॉम्‍प्‍लेक्‍स-वीक मॅग्‍नेटिक फिल्ड्स (व्‍हीसीएमएफ) प्रसारित करून मज्‍जासंस्‍थेला नॉन इन्‍वेसिव्‍हली सुसंगत ‘फ्लो’ स्थितीमध्‍ये आणण्‍यास मदत करते. यामुळे तणाव कमी होतो. वापरकर्त्‍यांचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची संकल्‍पना आहे. प्रतिबंधात्‍मक हेल्‍थकेअर टेक ईव्‍हॉल्‍व्‍ह२८ १०० टक्‍के नॉन-इन्‍वेसिव्‍ह दृष्टिकोन असून सुरक्षित, वजनाने हलके आणि वापरण्‍यास सोपे आहे.

यामागील तंत्रज्ञान:

व्‍हेरिएब कॉम्‍प्‍लेक्‍स-वीक मॅग्‍नेटिक फिल्‍ड्स (व्‍हीसीएमएफ) च्‍या दीर्घकालीन वापरामुळे शांतता, अवधान, मूड, माइण्‍ड-बॉडी सिंक आणि आरामदायीपणाशी संबंधित मेंदू व मज्‍जासंस्‍थेमधील मुख्‍य भागांना मार्गदर्शन करून स्‍वयं-नियमनाला चालना देते. यामुळे वापरकर्त्‍यांना तणाव कमी करण्‍यास, अवधान केंद्रित करण्‍यास, पुरेशी झोप मिळण्‍यास आणि डिजिटल क्षेत्रामुळे विचलित झालेले वैयक्तिक सामाजिक संबंध पुन्‍हा निर्माण करण्‍यास मदत होते, परिणामत: सर्वांगीण आरोग्‍याला चालना मिळते.

संपूर्ण दिवसभरात वापरासाठी डिझाइन करण्‍यात आलेले वजनाने हलके ईव्‍हॉल्‍व्‍ह२८ मोबाइल अॅपशी जुळून सर्वोत्तम प्रोग्राम्‍स देते, जे सर्वोत्तम तंत्रज्ञान सवयी विकसित होण्‍यास प्रेरित करतात. जवळपास ६० तासांपर्यत टिकणारी बॅटरी असलेले हे उद्योगामधील पहिलेच डिवाईस आहे. कंपनीची ईव्‍हॉल्‍व्‍ह सर्व वयोगटातील व भौगोलिक क्षेत्रांतील व्‍यक्‍तींना सुलभपणे उपलब्‍ध करून देण्‍याची, तसेच आधुनिक डिजिटली-संचालित युगामध्‍ये सर्वांगीण आरोग्‍यासाठी अपरिहार्य टूल बनवण्‍याची योजना आहे.  


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: