Thursday, May 2, 2024
Homeराजकीयकाँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मुंबईत उत्साहात मतदान - सांगली जिल्ह्यातील सर्व मतदारांनी बजावला हक्क...

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मुंबईत उत्साहात मतदान – सांगली जिल्ह्यातील सर्व मतदारांनी बजावला हक्क…

Share

सांगली – ज्योती मोरे

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मोठ्या उत्साहात मतदान झाले. प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील कार्यालयात हे मतदान लोकशाही पद्धतीने पार पडले. सांगली जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राज्याचे उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील, करीमभाई मेस्त्री, उत्तम पवार, अप्पाराया बिरादार, विलास साळुंखे, डॉ. दिग्विजय देशमुख, रवींद्र साळुंखे, डी.एम.पाटील, नंदकुमार कुंभार, माणिक भोसले, समित गायकवाड, बाळासाहेब पाटील या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

ही निवडणूक अत्यंत उत्साहात पार पडल्याचे सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले तसेच श्री. बाळासाहेब थोरात आणि अन्य प्रमुख नेतेमंडळी या निवडणुकीवर लक्ष ठेवून होती. या निवडणुकीसाठी ज्येष्ठ खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार शशी थरूर हे उमेदवार म्हणून उभे आहेत. दि. १९ रोजी नवी दिल्लीत मतमोजणी होणार आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: