Friday, May 17, 2024
Homeराज्यमनसेच्या रक्तदान शिबीर व पक्ष प्रवेशाला मनसर येथील नागरीकांचा व कार्यकर्त्यांचा उस्फुर्त...

मनसेच्या रक्तदान शिबीर व पक्ष प्रवेशाला मनसर येथील नागरीकांचा व कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद…

Share

रामटेक – राजु कापसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दी.०१/०८/२०२३ ला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मनसर ता.रामटेक येथे भव्य रक्तदान शिबीर व मनसेत प्रवेश करु इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम मनसे रामटेक तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे व मनशेसे नागपूर जिल्हा अध्यक्ष सुरेशजी वांदीले यांच्या संयुक्त नेतृत्वात पार पडला.

सदर कार्यक्रमाला सर्वसामान्य जनतेचा व मनसे कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर प्रसंगी ४४ लोकांनी रक्तदान केले व रक्तदानाचे महत्व पटवून देण्याचा उद्देशाने मनसेच्या सेल्फी पॉइंटवर फोटो काढून जनजागृतीस मदत केली.

त्याच प्रमाणे रॉकी चवरे व अनिवेश देशमुख या युवा मनसे कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून ४६ कार्यकर्त्यानी व मनसर येथील प्रतिष्ठित नागरिक पराग जोशी यांनी मनसेत प्रवेश केला.

या प्रसंगी मनसे नागपुर जिल्हा अध्यक्ष शेखरजी दुंडे, मनसे नागपुर जिल्हा संघटक सचिनजी नागपूरकर, मनसे रामटेक विधानसभा उप जिल्हाध्यक्ष रोशनजी फुलझेले, मनसे उमरेड विधानसभा उप जिल्हाध्यक्ष सुनीलजी सहारे, मनसे उमरेड तालुका अध्यक्ष भूषणजी पोरकुट,मनसे रामटेक माजी तालुका अध्यक्ष अनिलजी मुलमुले प्रामुख्याने उपस्थीत होते.

त्याच प्रमाणे रॉकी चवरे, अनीवेश देशमुख, प्रफुल्ल पुसदेकर, मयुर तळेगावकर, प्रदीप मनगटे, विक्की धूर्वे, शेखर केळवदे, निखील बोरीकर, आशिष बोरीकर, विजय टेकाम, विनोद प्रजापती, अमर वांदीले तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व जनसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: