Sunday, April 28, 2024
Homeराज्यअतिक्रमण विभाग अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही...

अतिक्रमण विभाग अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही…

Share

अमरावती – माननीय आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशाने गुरुवार दिनांक १५/२/२०२४ रोजी अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी व संध्याकाळी २ पथकाद्वारे शेगाव नाका ते हर्षराज कॉलनी रोड, रेल्वे स्टेशन, मालविय चौक, पंचवटी चौक, गाडगे नगर चौक, गाडगे नगर रोड ते शेगाव नाका चौक, चौधरी चौक, जयस्तंभ चौक येथे साहित्य जप्त ची कारवाई करण्यात आली.

३ ट्रक साहित्य जप्तीची अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली. सदर ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली. तसेच अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार. सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: