Homeराज्यवाचनाची सवय लागणे गरजेचे: प्रा.डॉ.गिरीश सपाटे...नगरधनच्या स्व.इंदिरा गांधी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा...

वाचनाची सवय लागणे गरजेचे: प्रा.डॉ.गिरीश सपाटे…नगरधनच्या स्व.इंदिरा गांधी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा…

Share

विजेत्यांना समानचिन्ह,सहभागी विद्यार्थ्यांना ग्रंथ; शिक्षक डॉ.पवन कामडी यांच्यातर्फे आयोजन….

रामटेक – राजु कापसे

नवीन पिढी ‘गुगल’मय झाली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी राहिली नाही..मात्र सुसंस्कारमय पिढी निर्माण होण्यासाठी वाचनाची सवय लागणे गरजेचे असल्याचे मत सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.गिरीशजी सपाटे यांनी प्रतिपादन केले.

नगरधन येथील स्व.इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शाळेतील शिक्षक डॉ.पवन देवीदास कामडी यांच्यातर्फे 21 फेब्रुवारीला आयोजित वक्तृत्व स्पर्धेत ते प्रमुख पाहुणे व स्पर्धेचे परीक्षक म्हणून बोलत होते.स्पर्धेचे हे 11 वे वर्ष होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका छाया कारेमोरे ह्या होत्या…

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून विद्यासागर कला महाविद्यालय रामटेक येथील मराठी विभागप्रमुख व साहित्यिक प्रा.डॉ.गिरीशजी सपाटे व समर्थ शिक्षण मंडळ,रामटेकचे सचिव,सृष्टी सौंदर्य ग्रुप रामटेकचे अध्यक्ष,प्रसिद्ध समाजसेवक श्री ऋषिकेशजी किंमतकर हे दोघे उपस्थित होते.स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येणारी ही स्पर्धा यावर्षी काही कारणास्तव उशिरा म्हणजे २१ फेब्रुवारीला ‘स्वामी विवेकानंद जयंती,

शिवजयंती व मराठी भाषा पंधरवाडा’ यांचे औचित्य साधून घेण्यात आली. ‘ मानवी जीवनात वाचनाचे महत्त्व ‘ हा वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता…स्पर्धेत ‘अ ‘ गटात 5 ते 8 वीतील मयंक कार्तिक ईश्वरकर, प्रथमेश भूमेश्वर गजभिये,भावेश अंगद बांगडे,

आरजू महेंद्र शेंडे, कु.दिव्याणी राजेश बनकर व श्रेयस अंकुश बावनकुळे तर ‘ब गटात’ 9 वी ते 11 वीतील गायत्री यशवंता देशमुख,सुप्रिया रामेश्वर मेंघरे,संगीता प्रकाश मेश्राम, वैभव विलास भिवगडे, श्रेया पुरुषोत्तम राऊत,नेहा महेंद्र धोपटे, जिज्ञासा शिवदास पडोळे,अर्पिता गणेश रंगारी,वंशिका विजय गाथे,वैष्णवी टिकाराम मलेवार हे विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते…

यामध्ये ‘अ’ गटातून प्रथम पुरस्कार आरजू शेंडे,द्वितीय पुरस्कार प्रथमेश गजभिये तर तृतीय पुरस्कार श्रेयस बावनकुळे या विद्यार्थ्यांना प्राप्त झाला…तर ‘ ब ‘ गटातून प्रथम पुरस्कार वैभव भिवगडे,द्वितीय पुरस्कार नेहा धोपटे व तृतीय पुरस्कार सुप्रिया मेंघरे यांना प्राप्त झाला…स्पर्धेचे परीक्षक तसेच विजेत्यांना सन्मानचिन्ह व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले..

सहभागी स्पर्धकांना ग्रंथ भेटवस्तू म्हणून देण्यात आले. परीक्षक डॉ.गिरीशजी सपाटे,परीक्षक श्री.ऋषिकेशजी किंमतकर व कार्यक्रमाध्यक्ष मुख्याध्यापिका छाया कारेमोरे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय अंगीकारण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले. टाईमकीपर म्हणून कु.निशा गौळीवार व कु. श्वेता दमाहे यांनी काम पाहिले..

कार्यक्रमाचे संचालन स्पर्धेचे आयोजक,शिक्षक डॉ .पवन देवीदास कामडी यांनी केले.आभार शिक्षक श्री.अशोक हजारे यांनी मानले…कार्यक्रमाला श्री.छमेश पटले,श्री.संतोष जाधव,श्री.खुशाल पुरे, सौ.निशा बाकडे,सौ.साधना मते,

सौ.विद्या मून,सौ.वंदना गायकवाड, सौ.श्रद्धा लांडगे, सौ.होलगिरे,कु.सुषमा फुटाणे या शिक्षक-शिक्षिकांसह शिक्षकेतर कर्मचारी श्री.सुनील जैस्वाल,ज्ञानेश्वर कामडी,श्रीमती क्षीरसागर,शैलेश मेश्राम,विकास कामडी तसेच विद्यार्थी या सर्वांनी सहकार्य केले..


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: