Saturday, May 18, 2024
Homeखेळएकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कूल खैरी परसोडा शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड...

एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कूल खैरी परसोडा शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड…

Share

रामटेक – राजू कापसे

दिनांक १८ व १९ऑगष्ट रोजी एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कूल बोरगाव बाजार ता.देवरी जि.गोंदिया येथे नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स अँड महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सव २०२३-२४ विभागीय स्तरावर विविध स्पर्धा पार पडल्या.

या दोन दिवसीय विभागीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,देवरी यांच्या हस्ते झाले.महोत्सवा मध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कूल खैरी परसोडा शाळेच्या एकूण ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

त्यापैकी १६ विद्यार्थ्यांची निवड राज्य स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. इंग्लिश रेसिटेशन मध्ये कु.हिना उईके हिने प्रथम पारितोषिक मिळविले आहे तसेच सांघिक नृत्याला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.प्रथम पारितोषिक मिळविणारे विद्यार्थ्यांना आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे, देवरी कॅम्पचे अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी चे सहायक प्रकल्प अधिकारी गायकवाड ,व शाळेचे प्राचार्य संजय बोंतावार, माजी प्राचार्य किनकर व मस्कर यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.

आमदार सहयराम कोरोटे तसेच बनकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले तसेच राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.नृत्यस्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन दिपाली उके व अविनाश ढवळे यांनी केले व इंग्रजी रेसिटेशन स्पर्धेसाठी कु.बावनकर यांनी मार्गदर्शन केले.

सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्या सुजाता अर्जुने, सांस्कृतिक विभाग समिती प्रमुख डाॅ.मालती श्रीखंडे , दिपाली उके, अविनाश ढवळे,कु.श्रृतिका बावनकर , राधिका गोलटकर, धनश्री दरणे, व्ही.सपकाळ,जी.धनगर , हुकरे, वैशाली राजुरकर, प्रेरणा थुंबे,ज्ञा.सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आणि राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: