Friday, May 3, 2024
Homeराज्यअमरावती | ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी २८ सप्टेंबर ऐवजी २९ सप्टेंबरला जाहीर...

अमरावती | ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी २८ सप्टेंबर ऐवजी २९ सप्टेंबरला जाहीर…

Share

अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 1 नुसार ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी गुरूवार, दि. 28 सप्टेंबर, 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती.

परंतू दि. 27 सप्टेंबर, 2023 रोजी प्रकाशित झालेल्या शासन अधिसूचनेद्वारे ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी 28 सप्टेंबर ऐवजी शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर, 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. दि. 28 सप्टेंबर रोजी विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय शैक्षणिक विभागाचे कामकाज नियमितपणे सुरु राहील.

तरी या बदलाची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आणि संलग्नित / घटक महाविद्यालयांतील शिक्षक, अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचा­यांनी नोंद घ्यावी, असे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी विद्यापीठाच्यावतीने कळविले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: