Saturday, May 4, 2024
Homeराज्यडॉ. शामा प्रसादांचे बलिदान व्यर्थ गेले नाही : आमदार सुधीर गाडगीळ...

डॉ. शामा प्रसादांचे बलिदान व्यर्थ गेले नाही : आमदार सुधीर गाडगीळ…

Share

सांगली – ज्योती मोरे.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. “काश्मीर साठी ३७० कलम घटनेत घालून पंडितनेहरूंनी या भारत देशात दोन पंतप्रधान, दोन राष्ट्रध्वज ठेवण्याची घोडचूक केली होती.

भारताचा एक पंतप्रधान आणि काश्मीरचा मुख्यमंत्रीही पंतप्रधान अशी जगावेगळी तरतूद तत्कालीन कॉंग्रेस सरकारने केली होती. परंतु डॉ. शामाप्रसादांनी याविरुद्ध आंदोलन करून एक देश मै दोन निशाण, दोन पंतप्रधान नाही चलेंगे अशी घोषणा देवून काश्मीर मध्ये प्रवेश केला.

शेख अब्दुला सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात टाकले आणि तिथेच त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. पण डॉ. शामा प्रसाद यांची मागणी संघाने आणि भाजपने कधीच सोडली नाही. अखेर संसदेने हि कलमे हटवल्याने डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही.”

असे विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले. डॉ. मुखर्जींच्या जयंती निमित्त संपर्क कार्यालयात ते बोलत होते. यावेळी डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आहे.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे नगरसेवक विनायक सिंहासने, संजय यमगर, गजानन आलदर, अभिजित भोसले, नगरसेविका सविता मदने, जयवंत पाटील, गौस पठाण, बजरंग पाटील, शैलेन्द्र गायकवाड, रवींद्र ढगे, धनाजी पाटील, सुनील मानकापूरे, रणजीत सावंत, सुधीर भगत, कय्युम शेख आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: