Monday, May 6, 2024
Homeराज्यमातृशक्तीच्या रक्षणासाठी डॉ. अभय पाटील यांना विजयी करा- महिला मुक्ती मोर्चा...

मातृशक्तीच्या रक्षणासाठी डॉ. अभय पाटील यांना विजयी करा- महिला मुक्ती मोर्चा…

Share

अकोला – सत्तारूढ भाजपचे नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत मणिपूर पासून तर गुजरातपर्यंत अनेक राज्यात महिलांवर अन्याय, अत्याचार व बलात्कार मोठ्या प्रमाणात होत आहेत. मणिपूरमध्ये तर महिलांना वस्त्रहीन करून त्यांची धिंड काढून त्यांना मारून टाकण्यात आले आहे.

भाजपच्या या जुलमी राजवटीत महिलांवर अत्याचार मोठ्या जोमाने होत असून महिला आता सुरक्षित राहिल्या नाहीत.म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीत अशा अत्याचारी भाजप राजवटीचा अंत करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्रदेश पातळीवर सर्व जाती जमातीच्या महिलांच्या न्याय हक्कासाठी आवाज उचलणाऱ्या मुंबई येथील महिला मुक्ती मोर्चा या संघटनेने केले आहे.

ads

महिला मुक्ती मोर्चा चे संस्थापक नितीन मोरे,अध्यक्ष अशोक खरात, प्रदेशाध्यक्ष संगीताताई वाघ समवेत संघटनेचे प्रदेश पदाधिकारी संपूर्ण राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यभरातील महिलांशी संवाद साधून त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत.

त्या दृष्टीने अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या प्रचारार्थ महिला मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार दौरे करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

महाविकास आघाडी हीच महिलांच्या स्वाभिमान व रक्षणासाठी सक्षम व दायित्व ओळखणारी आघाडी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, भीमशक्ती समवेत अनेक सेक्युलर व पुरोगामी पक्षांची मोट असणारी महा विकास आघाडी हीच सक्षम आहे.

ads

महिलांच्या आत्मरक्षण व स्वाभिमानासाठी सर्व जाती जमातीच्या व धर्माच्या मातृ शक्तींनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन महिला मुक्ती मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: