Thursday, April 25, 2024
HomeMarathi News TodayDolly Chaiwala | बिल गेट्सला चहा देणाऱ्या डॉली चायवालाची संपत्ती किती?...जाणून घ्या

Dolly Chaiwala | बिल गेट्सला चहा देणाऱ्या डॉली चायवालाची संपत्ती किती?…जाणून घ्या

Share

Dolly Chaiwala : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांची एकूण संपत्ती सुमारे $149 अब्ज आहे आणि ते जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. बिल गेट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर दिसताच व्हायरल होतात. तर बिल गेट्स जेव्हाही भारत दौऱ्यावर येतात तेव्हा ते नेहमीच एखादा व्हिडिओ किंवा फोटो शेअर करतात जो चर्चेचा विषय बनतो.

नुकताच प्रसिद्ध डॉली चायवालाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये बिल गेट्स ‘वन टी प्लीज’ म्हणताना दिसले होते. तुम्हाला बिल गेट्सला चहा देणाऱ्या डॉली चायवालाच्या नेट वर्थबद्दल सांगणार आहोत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर डॉली चायवाला चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.

डॉली चायवालाची शैली

डॉली चायवाला त्याची असामान्य शैलीसाठी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. डॉली चायवालाही त्याच्या असामान्य लूकमुळे खूप चर्चेत असते. चमकदार शर्ट, चष्मा आणि रंगीबेरंगी शैली डॉली चायवाला वेगळ बनवते. सोबतच डॉली याचं रजनीकांत स्टाईलमध्ये चहा देन ते पाहून लोकांना वेगळेपणा वाटते.

डॉली चायवालाची नेट वर्थ

डॉली गेल्या 16 वर्षांपासून महाराष्ट्रातील नागपुरात चहाचा स्टॉल लावत आहे. अनेक सेलिब्रिटीही डॉलीच्या चहाचे वेडे असून त्याच्या टपरीवर चहा प्यायला येतात. डॉली चहाच्या स्टॉलमधून चांगली कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉली सुमारे 10 लाख रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.

डॉली चायवालाची चहा बनवण्याची पद्धत लोकांना आवडते. दूरदूरवरून फूड व्लॉगर्स त्यांचे व्हिडिओ बनवण्यासाठी येतात आणि सोशल मीडियावर शेअरही करतात. मात्र, जेव्हापासून बिल गेट्सने तिच्या टपरीवर चहा प्यायला, तेव्हापासून डॉली चायवाला अधिक प्रसिद्ध झाला आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: