Thursday, April 25, 2024
Homeराज्यजिल्हा व तालुका न्यायालयांत दि. ३ मार्चला लोक अदालत...

जिल्हा व तालुका न्यायालयांत दि. ३ मार्चला लोक अदालत…

Share

अकोला – संतोषकुमार गवई

राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालत दि. ३ मार्च रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ वा. दरम्यान होणार आहे.

त्यात दाखलपूर्व प्रकरणे व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची सुनावणी होईल. धनादेश अनादर प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, वीज, पाणी देयक प्रकरणे, आपसात तडजोड करता येण्याजोगी फौजदारी, वैवाहिक व इतर दिवाणी वाद आदी दाखलपूर्व प्रकरणांची सुनावणी होईल.

त्याचप्रमाणे, बँक कर्जवसुली, धनादेश अनादर, अपघात भरपाई, वैवाहिक वाद, भूसंपादन, सेवाविषयक पगार, भत्ते, सेवानिवृत्ती आदी कायदेशीर प्रकरणे, महसूल प्रकरणे, भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकूम, विशिष्ट पूर्वबंध, करार पूर्तता आदीसंबंधी न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची सुनावणी होईल.

असे होतात फायदे

लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. साक्षी-पुरावे आदी बाबी टळून निकाल जलद लागतो. सामंजस्याने तोडगा निघाल्याने दोन्ही पक्षांना समाधान मिळते व कटुता टळते. वेळ व पैसा वाचतो. लोकअदालतीत निकाली निघालेल्या प्रकरणांत कोर्ट फीची रक्कम परत मिळते.

पक्षकारांनी संबंधित न्यायालय, विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा व लोकअदालतीत सहभागी होऊन वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एस. तिवारी व सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: