Friday, May 17, 2024
Homeराज्यआकाशझेप फाउंडेशन तर्फे क्रीडा किट वितरण...

आकाशझेप फाउंडेशन तर्फे क्रीडा किट वितरण…

Share

रामटेक – राजु कापसे

रामटेक पारशिवनी तालुक्यात येणार्‍या राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे प्राचार्य सोनिराम धोटे व आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार यांचे मार्गदर्शनाखाली ९ फेब्रुवारीला विद्यालयाच्या २५ खेळाडूंना आकाशझेप फाउंडेशन रामटेक तर्फे क्रीडा कीट वितरण करण्यात आले.

याप्रसंगी १४ वर्षीय वयोगट व १७ वर्षीय वयोगटात कबड्डी खेळणाऱ्या शाळेच्या खेळाडूंना कीट वितरित करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक व आकाशझेपचे सचिव साक्षोधन कडबे, दिलीप पवार, क्रीडा शिक्षक प्रशांत पोकळे,

शैलेंद्र देशमुख, नीलकंठ पचारे, अमित मेश्राम, सौ. तारा दलाल, शिक्षकेत्तर कर्मचारी मोरेश्वर दुनेदार, राशिद शेख, लिलाधर तांदूळकर व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: