Monday, June 17, 2024
spot_img
Homeराज्यमूर्तिजापूरच्या मुख्य चौकात घाणीच साम्राज्य...नगर पालिका प्रशासनाच दुर्लक्ष...

मूर्तिजापूरच्या मुख्य चौकात घाणीच साम्राज्य…नगर पालिका प्रशासनाच दुर्लक्ष…

मूर्तिजापूर शहरातील मुख्य चौकातच घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे, शहरातील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोरील असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतीला लागूच कचाराचे मोठे साम्राज्य तयार झाले आहे. या सर्व प्रकाराकडे नगर पालिकेच्या स्वच्छता विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याचे सदर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणे आहे…

शहरात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी असूनही येथील नागरिक, दुकानदार उघड्यावरच कचरा टाकत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले असून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारल्या जात नाही.

मुख्य चौकातून ये-जा करणाऱ्या व तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तर मुख्य रस्त्याच्या बाजूलाच काही बेजबाबदार कचरा टाकत असून येथे भला मोठा कचर्याचा ढीग तयार झाला आहे. तर या ठिकाणी अनभोरा, दालंबी जाण्यासाठी ऑटोरिक्षा उभ्या असतात त्यामुळे दिवसा हा कचरा दिसत नाही, मात्र या कचर्याची दुर्गंधी मुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना फार त्रास होत आहे…महाव्हाईस न्यूज साठी अर्जुन बलखंडे मुर्तीजापुर…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: