Friday, May 17, 2024
HomeSocial Trendingरिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूतवर काळी जादू केली होती?…अभिनेत्रीने केला खुलासा…काय म्हणाली?…जाणून...

रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूतवर काळी जादू केली होती?…अभिनेत्रीने केला खुलासा…काय म्हणाली?…जाणून घ्या

Share

न्यूज डेस्क : अभिनेता सुशांत सिंग राजपूतने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अनेक आरोपांना, पोलीस चौकशीला सामोरे जावे लागले. त्यसाठी तिला तुरुंगातही जावे लागले. रिया चक्रवर्ती हिने तीन वर्षांपूर्वी अनुभवलेली परिस्थिती आणि लोकांचे संवाद ऐकण्याचा अनुभव शेअर केला आहे.

सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajputच्या मृत्यूबद्दल बोलताना रिया म्हणाली, ‘जेव्हा मी लोकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते तेव्हा काही लोक माझ्याकडे असे पाहत होते की मी काहीतरी केले आहे. मी लोकांचे चेहरे वाचू शकते. लोक मला डायन म्हणायचे, मला काही फरक पडला नाही. कोणास ठाऊक, कदाचित मला काळी जादू माहित आहे. Rhea Chakraborty cast black magic समाजातील लोकांचे म्हणणे आहे की, लग्नानंतर जर पुरुष जास्त मद्यपान करू लागला तर त्याच कारण त्याची पत्नी आहे. जर त्याचे करिअर अपयशी ठरले तर त्याला त्याच्या पत्नीलाही जबाबदार धरले जाते.

रिया म्हणाली, “लोकांना मानसिक आरोग्याची स्थिती समजत नाही. सुशांत यशस्वी झाला, पण त्याचे मानसिक आरोग्य का बिघडले हे मला माहीत नाही. “यशस्वी लोक देखील तणावग्रस्त होऊ शकतात. सुशांतने त्याचा जीव का घेतला हे मला माहीत नाही. पण मला माहित आहे की तो कोणत्या परिस्थितीतून गेला होता. मला एनसीबी आणि ड्रग्सबद्दल बोलायचे नाही.

रियाने तिचा तुरुंगातील अनुभव कथन केला. ती म्हणाली की “तुरुंग हे एक मनोरंजक ठिकाण आहे कारण तुम्ही समाजापासून अलिप्त आहात. तुरुंगात मला खूप काही शिकायला मिळाले. माझ्यावर खटला सुरू होता. मी दोषी नव्हते. मी शिकले की आपण चित्रपटांसाठी कसे धावत राहतो, पण तुरुंगात राहणाऱ्या महिलांनी कधी तिथे समोसा जरी भेटला तर त्यांना खूप आनंद होते.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: