Homeराज्यआलापल्लीच्या पेसा कमिटीच्या निवडीत दीपक तोगरवार यांनी मारली बाजी…प्रतिस्पर्धी उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात...

आलापल्लीच्या पेसा कमिटीच्या निवडीत दीपक तोगरवार यांनी मारली बाजी…प्रतिस्पर्धी उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन…

Share

आलापल्ली : अहेरी उपविभागातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या आल्लापल्ली येथील पेसा(ग्रामकोष)समिती अध्यक्षपदी दीपक तोगरवार तर सचिव पदी मीना सल्लम यांची मंगळवारी क्रीडा संकुल येथे झालेल्या ग्रामसभेत बहुमताने निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या आधी पेसा कमेटीच्या निवडीसाठी दोन वेळा ग्रामसभा बोलावून निर्णय न झाल्यामुळे तहकूब करण्यात आली होती.

आलापल्लीच्या इतिहासात पहिल्यांदाच पेसा कमिटी निवडी साठी ग्रामपंचायत सभागृहाबाहेर ग्रामसभा बोलावून मोठा पोलीस बंदोबस्त लावून ही निवडीची प्रक्रिया पार पाडावी लागली.

या निवडीसाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांची व्यवस्था करून ग्रामसभेला मोठ्या महिला व पुरुषांना आपल्या पारड्यात वजन टाकण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करून लवाजमा आणला होता. म्हणजे मोठ्या प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती.
मोठ्या गदारोळात ही सभा पार पडली यामध्ये युवा कार्यकर्ता दीपक तोगरवार यांची अध्यक्ष पदी तर सचिव पदी मीना सल्लम यांची निवड करण्यात आली.

निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री राजे अंबरीश राव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आलापल्लीत विजयी मिरवणूक काढून आतिषबाजी करण्यात आली.


Share
Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: