Homeराज्यकल्याण ग्रामीण विभातील ज्येष्ठ पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी...

कल्याण ग्रामीण विभातील ज्येष्ठ पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी…

Share

पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीला केले गजाआड…

टिटवाळा ( कल्याण ) – प्रफुल्ल शेवाळे

मांडा टिटवाळा परिसरात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या फटाके विक्रीच्या स्टॉलची पाहणी अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे व अग्निशमन दलाचे अधिकारी नवाब तडवी हे तपासणी करीत असतांना तेथे वृत्तसंकलन व व्हिडीओ काढीत असलेले दै. गावकरी आणि दै. जनमत चे पत्रकार राजू टपाल यांना अनेक गुन्हे दाखल असलेला अवनिश यादव याने शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत व्हिडीओ काढण्यास मज्जाव केला.

एका विशिष्ट भाईचे आपण माणूस असून तुला मी दाखवतोच असे तिथे जमलेल्या नागरिकांसमोर धमकी तथा खंडणी उकळण्याचा प्रकार केल्याने अखेर टपाल यांनी रितसर कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा रजिस्टर क्र. ०६७६ भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० अन्व्ये कलम ३२३, ३८५, ३८६, ५०४, ५०६, ३४ आदी कलमांतर्गत आरोपी ला अटक केली आहे.

कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या सुचनेनुसार कल्याण तालुका पोलीस पथकाने तत्परता दाखवत २४ तासाच्या आत आरोपीला तात्काळ अटक केले. सदरील आरोपी अवनिश यादव हा सराईत गुन्हेगार असून टिटवाळा मांडा पोलीस स्टेशनला त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

तो छोट्या मोठ्या फेरीवाले व हातगाड्यावाल्यांकडून देखील हप्ते काढीत असून जो कुणी पैसे ध्यायला नकार देईल त्याला मारहाण देखील करीत आहे. मात्र त्याच्या भितीमुळे सर्वसामान्य नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नसल्यामुळे तो निबरगट्ट झाला आहे. पत्रकार राजू टपाल यांना फटाके स्टॉल आपले असून त्याची बातमी लावू नकोस अश्या प्रकारे धमकी व खंडणी चा प्रकार हा तिथे असलेल्या सिसिटिव्ही मध्ये कैद झालेला आहे.

दरम्यान पोलिसांनी अवनिश कदम याच्यावर करावाईचा बडगा उगारल्यामुळे स्थानिक रहिवासी,दुकानदारांनी आता सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. या सर्व घटनेनंतर ज्येष्ठ पत्रकार टपाल यांनी पत्रकार कलम कायदा आणखीन वाढले पाहिजेत अशी भावना व्यक्त केली आहे.


Share
Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: