Homeराज्यपातूर येथील जुने बस स्टॅन्ड वर प्राणघातक हल्ला युवक गंभीर जखमी...

पातूर येथील जुने बस स्टॅन्ड वर प्राणघातक हल्ला युवक गंभीर जखमी…

Share

पातूर शहरातील जुने बस स्टॅन्ड वर एका युवका वर दोन जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचि घटना 27 सप्टेंबर च्या रात्री 8 वाजता चे दरम्यान घडल्याने शहरात एकच खडबड उडाली होती याबाबत सविस्तर वृत्त असे कि स्थानिक मेहबूब नगर येथील सैय्यद जाविद सैय्यद शब्बीर हा मोटारसायकल ने जुने बस स्टॅन्ड येथील एका हॉटेल वर आला असता पाठीमागून,

पातूर येथील सलमान शेख बिस्मिल्लाह शेख याने मला आवाज दिला त्याचे सोबत त्याचा अकोला येथील मित्र सैय्यद सोहेल सैय्यद सादिक या दोघांनी मागील रागातून वाद घालत माझ्या वर धारदार शस्त्रने डाव्या हातावर, खांद्यावर, मनगट वर जबरदस्त वार करीत असतांना मि माझा जिव वाचविण्यासाठी धावत असतांना दोघांनी माझा पाठलाग करीत,

मला पकडून मला मारहाण करत असतानी मि कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटून धावत पोलीस स्टेशन गाठून सविस्तर हकीकत पोलिसांना सांगितली असता मला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी नेण्याची व्यवस्था करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले,

असे फिर्यादी ने आपल्या तक्रारी मध्ये म्हटले असून फिर्यादी चे तक्रारी वरून आरोपी सलमान शेख बिस्मिल्लाह शेख, सैय्यद सोहेल सैय्यद सादिक यांच्या विरुद्ध पातूर पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: