Homeराज्यसांगली सायबर पोलीस ठाण्यातर्फे सायबर जागरूकता दिवस साजरा...

सांगली सायबर पोलीस ठाण्यातर्फे सायबर जागरूकता दिवस साजरा…

Share

सांगली – ज्योती मोरे

सायबर गुन्ह्यांचा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडून चालवल्या जाणाऱ्या इंडियन सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटर या योजनेअंतर्गत तसंच ऑक्टोबर 2022 मध्ये सायबर जागरूकता दिवस सीआयडीचे एक वर्ष पूर्ण होत असल्याने सायबर जागृतीचा प्रसार व्यापक रीतीने साजरा करावा यासाठी,

आज 7/10/2022 रोजी सायबर जागरूकता दिवस साजरा करण्यात बाबत विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर यांच्या आदेशाने, सांगली सायबर पोलीस ठाण्यातर्फे श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय विश्रामबाग सांगली येथे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले,

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, यांच्या आदेशाने सायबर पोलीस ठाण्याचेपोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार, पोलीस अंमलदार करण परदेशी, पोलीस अमोल शिरसागर यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार यांनी आजच्या युगात इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे .मानवाच्या दैनंदिन जीवनातील बरेचसे व्यवहार हेही इंटरनेटच्या माध्यमातून केले जातात इंटरनेट आणि संगणकीय साधनांमुळे मानवी जीवन जरी सुलभ झालं असलं तरी अपुऱ्या माहितीमुळे ते धोक्यातही आलेले आहे.

समाजातील नागरिकांना आपले आर्थिक व सामाजिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अशा सामाजिक व आर्थिक फसवणुकीमुळे काहींनी आपला प्राणही गमावला आहे सध्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे महिला आणि विद्यार्थिनींनी काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.

पोलीस अंमलदार करण परदेशी यांनी सायबर गुन्ह्याचे प्रकार कसे असतात ते ओळखावे कसे? तसेच बँक फ्रॉड तसेच आर्थिक फसवणूक बाबत गुन्हे दाखल करत असताना काय काय गोष्टी असाव्या? याबाबत मार्गदर्शन केले.पोलीस अंमलदार अमोल शिरसागर यांनी सायबर सिक्युरिटी व प्रायव्हसी सेटिंग्स याबाबत पीपीटी वरून प्रेझेंटेशन केले. सायबर गुन्हा घडल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थिनींनी तसेच पालकांनी महिला आणि मुलींचे फोटो हे सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत.

तसेच आपल्या मोबाईल मध्ये व सोशल मीडियावर असणाऱ्या प्रायव्हसी सेटिंगचा योग्य वापर करावा. मनाला आकर्षित करणाऱ्या अनोळखी लिंक ओपन करू नयेत. याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. या कार्यक्रम श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम ए गाणू, उपप्राचार्य श्री व्ही बी चौगुले महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: