Thursday, May 2, 2024
Homeराज्यपुण्यस्मरण सोहळा संपन्न...

पुण्यस्मरण सोहळा संपन्न…

Share

दानापूर – गोपाल विरघट

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांचे पुण्यस्मरण तसेच सर्व संत स्मृती दिनाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ दानापूर व ग्रामस्थ यांचे सयुक्तिक विद्यमाने तीन दिवशीय महोत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.दिं१८ला—ब्रह्ममुहूर्तावर श्री तुकडोजी महाराज यांचे अस्ती स्मारकाचे जलाभिषेक करण्यात आले.

त्यानंतर तिर्थस्थापना श्री माणिकरावजी वाघमारे व सौ.देवकाबाई वाघमारे यांचे हस्ते करण्यात आला.५.४५ला ध्यान.प्रचारक आमझरे महाराज यांनी ध्यानाचे महत्त्वावर आपले चिंतन व्यक्त केले.संध्या.७वा.सामुदायिक प्रार्थना चिंतन श्री ऊन्हाळे गुरूजी(केंद्रीय प्रतिनिधी)रात्री ८ला.किर्तन ह.भ.प.श्री हळदे महाराज यांचे होते.दि.१९ ला.५.४५ला.सामुदायिक ध्यान.श्री हळदे महाराज यांनी चिंतन व्यक्त केले.

11ते2पर्यंत भजन सम्मेलन झाले त्यानंतर महिला राष्ट्रीय प्रबोधनकार, ग्रामगीताचार्य सौ.पोर्णिमाताई सवई यांच्या प्रमुख उपस्थिती महिला मेळावा झाला.महिला मेळावच्या अध्यक्षा दानापूर ग्रा.प.च्या सरपंच सौ.सपनाताई धम्मपाल वाकोडे होत्या.तेल्हारा येथून आलेल्या सेवा मंडळाच्या प्रचारीका सौ.संगीताताई गावंडे यांनी महिलांच्या जबाबदारीची जाणीव आपल्या संबोधनातू दिली.सौ.अनुपमाताई अजेय विखे.यांनी पालकांची भुमिका विषद करतांना संस्कार,आणि स्वच्छतेवर भर दिला.

मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शीका सौ.पोर्णिमाताईं सवई यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेवर तसेच पाल्यांच्या संस्कारवर पालकां ची भुमिका विषद करून सामुदायिक प्रार्थना,ध्यान तसेच बालसुसंस्कार ही काळाची गरज आहे.आपल्या पाल्यांना यामध्ये पाठविण्याचे आव्हान केले.आभार प्रदर्शन सौ योगीताताई गोपाल माकोडे यांनी केले.सुत्रसंचालन कु.रेणुका नागपुरे(सोगोडा) यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. पौर्णिमताई सवाई यांचे स्वागत सौ.देवकाबाई वाघमारे यांनी केले. सौ संगीता ताई गावंडे यांचे स्वागत सौ.सविताताई येऊल यांनी केले. आणि सरपंच सौ. सपनाताई धम्मपाल वाकोडे यांचे स्वागत सौ. हर्षाताई देवेंद्र सोनटक्के यांनी केले.सौ. दीपमाला रवींद्र दामधर (माजी जी.प.सदस्य)यांचे स्वागत सौ.नंदाताई इंगळे यांनी केले.सौ. राधाताई श्याम ढाकरे (माजी जी.प. सदस्य) यांचे स्वागत सौ.जयाताई दीपक वाघमारे यांनी केले.सौ.राजेश्री गणेश ढाकरे यांचे स्वागत सौ.लक्ष्मी गणेश दांदळे यांनी केले.

सौ. अनुपमा अजेय विखे यांचे स्वागत सौ. संगीताताई गोपाल विरघट यांनी केले. सौ योगिताताई गोपाल माकोडे यांचे स्वागत श्रीमती. उषाताई प्रल्हाद गिरी यांनी केले. 7 वाजता सामुहिक प्रार्थना झाली आणि सामुदायिक प्रार्थना महत्त्वावर शेख गुरुजी यांनी चिंतन व्यक्त केले. तसेच ठीक 8.30 वाजता ह.भ. पारायण गुलाबराव महाराज यांच्या राष्ट्रीय किर्तनाचा कार्यक्रम झाला.

दि.20 ला सकाळी 5.30 ला सामुदायिक ध्यान करण्यात आले आणि ध्यानाच्या महत्त्वावर शेख गुरुजी यांनी चिंतन व्यक्त केले.9 वाजता पालखी मिरवणूक काढण्यात आली.12.30 ला संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि ह.भ. पारायण आमझरे महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. तसेच राष्ट्र वंदना आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: