Friday, May 10, 2024
Homeराज्यसंत निरंकारी सत्संग सेवा मंडळा कडुन पुर्णा नदी व लक्षेश्वर संस्थान लाखपुरी...

संत निरंकारी सत्संग सेवा मंडळा कडुन पुर्णा नदी व लक्षेश्वर संस्थान लाखपुरी परिसराची स्वच्छता…

Share

अतुल नवघरे.

लाखपुरी : २६ , मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे पूर्णा नदीच्या तीरावर व तीर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थान मधील मंदिराच्या परिसरात निरंकारी सत्संग सेवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी मुर्तीजापुर निरंकारी सत्संग सेवा मंडळ चे शेकडो महिला ,पुरुष , युवक , युवती , यांचा प्रामुख्याने सहभाग होता , सुरुवातीला पूर्णा नदी घाटावर व लक्षेश्वर संस्थांच्या परिसरात स्वच्छता अभियानाला सकाळी ८ वाजता पासून ११ वाजेपर्यंत , स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी पुर्णा नदीमधील केर,

कचरा , काट्या इ. परिसरातील घाण काढुन नदी परिसरातील स्वच्छता करण्यात आली .सदर स्वच्छता अभियान संत निरंकारी बाबा सदगुरु बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व भारत सरकारच्या आजादीच्या अमृत महोत्सव निमीत्त हा उपक्रम आज लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थान लाखपुरी व पूर्णा नदी तीरावर राबवण्यात आला होता.

यामध्ये बहुसंख्य संत निरंकारी मंडळ मधील महिला पुरुष लहान मुलं यांचा समावेश होता.नदी परिसर एकदम स्वच्छ करण्यात आला .निरंकारी मंडळ मुर्तीजापुर तालुक्याच्या वतीने सलग ३० ते ४० वर्षापासून हा उपक्रम सतत चालू आहे . या आधी त्यांनी मेन हॉस्पिटल मूर्तिजापूर , रेल्वे स्टेशन मुर्तीजापुर , मुर्तिजापूर बस स्थानक असे अनेक परिसरात स्वच्छता केलेली आहे व या माध्यमातून त्यांनी अनेक अभियाने त्यांनी राबविले आहेत.

आणि यापुढे सुद्धा त्यांचे कार्य हे सतत सुरू ठेवणार आहे असे त्यांनी यावेळी मत त्यांनी व्यक्त केले. पूर्णा नदीच्या पात्रावर अतिशय दुर्गंधी पसरली होती. परंतु आज स्वच्छतेच्या माध्यमातून हा परिसर एकदम स्वच्छ करण्यात आलेला आहे. यावेळी संत निरंकारी मंडळाचे सर्व सभासद महिलावर्ग पुरुष मंडळी लहान मुलं यांचा समावेश होता.

लक्षेक्ष्वर संस्थान च्या वतीने फराळ , चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली.व श्री लक्षेक्ष्वर संस्थान चे सेवाधारी, ग्रामपंचायत लाखपुरी सरपंच , ग्रा.प.चे पदाधिकारी ,लाखपुरी येथील पत्रकार स्वच्छता अभियान दरम्यान उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: