Friday, May 17, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा : मंगेश चिवटे; सांगलीतील शिवसेना...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा : मंगेश चिवटे; सांगलीतील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट…

Share

सांगली – ज्योती मोरे

फक्त एक फोन करा, आणि तत्काळ मिळवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून मदत मिळवा तसेच गोरगरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या वैद्यकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी केले.

सांगलीतील पुष्पराज चौक, माळी चित्रमंदिर जवळ असलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयास शनिवारी त्यांनी भेट दिली. यावेळी मंगेश चिवटे बोलत होते.

यावेळी शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंगेश चिवटे यांच्या हस्ते सविधांनाचे संक्षिप्त पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील गरजूंना आज अखेर ७० कोटी हून अधिक वैद्यकीय सहायता निधीचे वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल पाटील, युवराज काकडे, दिनकर धोत्रे, धनंजय खाडीलकर,सागर शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे यांनी असे आवाहन केले की,
सांगलीतील माळी चित्र मंदीर जवळ असलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचाचे काम नागरिकांनीसाठी सुरु आहे नागरिकांनी लाभ घ्यावा.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: